अमरावती : भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे ते पती होते. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यानंतर ते दोघे पुण्यात स्थायिक झाले होते. देवीसिंह रणसिंह शेखावत हे एक भारतीय शेतकरी आणि राजकारणी होते. शेखावत हे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती होते. त्यांनी यापूर्वी अमरावतीचे माजी महापौर म्हणूनही काम केले आहे.
अमरावतीचे आमदार : देवीसिंह शेखावत, यांनी रसायनशास्त्राचे व्याख्याते म्हणून काम केले. ७ जुलै १९६५ मध्ये प्रतिभा पाटील यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. प्रतिभाताई पाटील आणि देवीसिंह रणसिंह शेखावत यांना एक मुलगी आणि एक मुलगा रावसाहेब शेखावत आहे. रावसाहेब शेखावत हे देखील एक राजकारणी होते. ते काही काळ अमरावतीचे आमदार होते. शेखावत यांना १९७२ मध्ये मुंबई विद्यापीठातून पीएचडी केली होती.
अमरावतीचे माजी महापौर : प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती होण्यापूर्वी, ते त्यांच्या विद्या भारती शिक्षण संस्था फाउंडेशनद्वारे संचालित महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अमरावतीचे माजी महापौर म्हणून काम करत होते. प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमाणेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य देखील होते. १९८५-१९९० या कालावधीत महाराष्ट्र राज्य विधानसभेतील अमरावती मतदारसंघातून निवडून आले होते. विधानसभेचे माजी सदस्य देखील ते राहिले आहेत. १९९५ रोजी मतदारसंघातील लढतीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्यावर, त्यांच्यावर आणि शेखावत यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले. यापैकी बुलडाणा जिल्ह्यातील विद्या प्रसारक शिक्षण मंडळ संचालित शाळेतील किसन ढगे या शिक्षकाने नोव्हेंबर १९९८ मध्ये आत्महत्या केली होती.
आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी : संस्थेचे अध्यक्ष असलेले देवीसिंह रणसिंह शेखावत आणि इतर चार जणांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी त्यांनी लिहिली होती. अपघाती मृत्यू म्हणून पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला होता. तेव्हा ढगे यांच्या पत्नीने बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग जेएमएफसी यांच्याकडे अपील केली होती. त्यावर जेएमएफसीने पोलिसांना फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले होते. ढगे यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप फेटाळण्याची मागणी देवीसिंह शेखावत यांनी न्यायालयाकडे केली होती. दोन कनिष्ठ न्यायालयांनी ही याचिका फेटाळून लावली होती आणि जून २००७ पर्यंत हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित होता. त्या न्यायालयातील न्यायाधीशांनी २००९ मध्ये देवीसिंह शेखावत यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते, सुदैवाने यात त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाचा कोणताही पुरावा सापडला नाही.