ETV Bharat / state

'लोकांच्या अन्नात माती कालवणाऱ्या मंत्र्यांवर कठोर कारवाई करा' - माजी कृषी मंत्री अनिल बोंडे बातमी

अमरावती जिल्ह्यात सरकारकडून गर्भवती महिला व एक ते तीन वयोगटातील लहान मुलांना देण्यात येणारा चणा निकृष्ट दर्जाचा असल्याने संबंधितांसह त्या विभागाच्या मंत्र्यांवरही कारवाई करण्याची मागणी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली.

चणा दाखवताना कृषी मंत्री अनिल बोंडे
चणा दाखवताना कृषी मंत्री अनिल बोंडे
author img

By

Published : Sep 28, 2020, 7:54 PM IST

अमरावती - महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने राज्यात महिला आणि बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात दिला जाणारा चणा हा अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करत गरीब लोकांच्या अन्नात माती कालविणाऱ्या या विभागाच्या मंत्र्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे.

बोलताना अनिल बोंडे

सोमवारी (दि. 28 सप्टें.) डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्ह्यातील तळणी गावातील अंगणवाडी केंद्रातून बालक आणि गर्भवती महिलांना आहारात दिला जाणारा चण्याचे पाकीट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी आले होते. यावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी त्यांच्या सोबत होत्या.

राज्यातील एक ते तीन वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीतून या चण्याचा वाटप केला जातो आहे. गर्भवती महिलेलाही पोषण आहारात खराब चणे दिले जात आहे. हे चणे शिजत नाहीत. हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. असे चणे पोषण आहार म्हणून वाटताना यांना थोडीशीही लाज वाटत नाही. लहान मुलाच्या पोषण आहारात भ्रष्टाचार करणे म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार या शासनाद्वारे सुरू आहे. आता कोरोनाच्या काळात आलेले हे चणे अधिकाऱ्यांनी खाऊन दाखवावेत. महाराष्ट्र शासनाच्या या चण्याचे पॅकेजिंग कामठी येथे करण्यात आले आहे. या निकृष्ट चण्यांच्या उदाहरणावरून पोषण आहारात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार खिसे गरम करणाऱ्या मंत्र्यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांच्या मंत्रालयात होत असल्याचा आरोप देखील डॉ. अनिल बोंडे यांनी केला.

हेही वाचा - शिराळा-पुसदा मार्गावर अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.