अमरावती - जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस शनिवारी दूपारपर्यंत कायम राहिल्याने सर्वच धरणांचा जलसाठा वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणासह सहा धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तिवसा तालुक्यातल्या कौंडण्यपूर जवळून वाहणार्या वर्धा नदीला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पुर आल्याने अमरावती-वर्ध्याला जोडणार पूल पाण्याखाली गेला होता. तसेच तिवसा तालुक्यातील नमस्कारी या गावाला जोडणाऱ्या पुलावरून अद्यापही पाणी वाहत असल्याने मागील २४ तासांपासून गावाचा संपर्क तुटला आहे.
पुरामुळे जिल्ह्यातील 'या' गावाचा मागील २४ तासांपासून तुटला संपर्क...वाचा सविस्तर - तिवस्यातील नमस्कारी गाव
मागील ३ दिवसांपासून जिल्ह्यासह मध्यप्रदेशात जोरादार पाऊस सुरू आहे. यामुळे अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग करण्यात येतोय. यातच जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे.