ETV Bharat / state

अमरावतीच्या मोर्शीत विघ्नहर्त्यावरही महापुराचं विघ्न....

नळ दमयंती नदीला आलेल्या महापुरामुळे मोर्शीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे घरातील चौरंगावर विराजमान झालेले गणराय जाग्यावरच विरले. तर दोन सार्वजनिक मंडळाचे मोठे गणपती वाहून गेले आहेत.

अमरावतीतील पूर परिस्थिती
author img

By

Published : Sep 5, 2019, 5:20 PM IST

अमरावती - विघ्नहर्ता म्हणून ज्याची ख्याती आहे. त्या गणरायाला देखील काल मोर्शी येथे अचानक आलेल्या महापुराच्या विघ्नाचा सामना करावा लागला. नळ दमयंती नदीला काल सायंकाळी मोठा पूर आल्याने मोर्शीच्या अनेक भागातील घरांमध्ये सहा सात फूट पाणी शिरले आहे. यामुळे घरातील चौरंगावर विराजमान झालेले गणराय जाग्यावरच विरले. तर दोन सार्वजनिक मंडळाचे मोठे गणपती वाहून गेले आहेत.

अमरावतीतील पूर परिस्थिती

नळ दमयंती नदीला आलेल्या महापुरामुळे मोर्शीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यानंतर सुरक्षिततेची खबरदारी म्हणून शहरातला विज पुरवठा खंडीत करण्यात आला. दरम्यान, पेठपुरा, इंदिरा नगर, आठवडी बाजार, गाडगे नगर, राम मंदिर, गधेघाट पुरा, खोलवाट पुरा आणि सुलतान पुरा या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांसह घटनास्थळ गाठून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

दरम्यान, सिंभोरा धरण परिसरातही अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे येत्या २४ तासात केव्हाही धरणाचे दरवाजे उघडल्या जाऊ शकतात. मोर्शीत काल १४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अप्पर वर्धा धरण 89 टक्के भरले आहे.

Intro:अमरावतीच्या मोर्शीत विघ्नहर्त्यावरही महापुराच विघ्न 

महापुरात घरातील गणपती चौरंगावरच विरले,मंडळाचे गणपती गेले वाहून
-----------------------------------------------------------
अमरावती अँकर
    विघ्नहर्ता म्हणून ज्याची ख्याती महान आहे. त्याच गणरायाला देखील काल मोर्शी येथे अचानक आलेल्या महापुराच्या विघ्नाचा सामना करावा लागला.नळ दमयंती नदीला काल सायंकाळी मोठा पूर आल्याने मोर्शीच्या अनेक भागातील घरात सहा सात फूट पाणी घुसल्याने चौरंगावर विराजमान झालेले गणराय जाग्यावरच विरले.तर दोन सार्वजनिक मंडळाचे मोठे गणपती वाहून गेले. दरम्यान एका मोठया आपल्या बाप्पाला सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी भक्तांनी जीव धोक्यात घालुन गणपतीला पुरात असलेल्या मंडपातून काढले.

पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेक घरातील नुकसान झाले आहे, मात्र सायंकाळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आपत्ती व्यवस्थापन पथकासह पोलीस घटनास्थळी घेऊन गेले होते तर पुरात बेघर झालेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.

पावसामुळे अख्या मोर्शी शहराचा विज पुरवठा खंडित झाला होता.वीजेमुळे मोठी हानी होऊ नये म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव. पेठपुरा, इंदिरा नगर ,आठवडी बाजार , गाडगे नगर ,राम मंदिर , गधेघाट पुरा ,खोलवाट पुरा आणि सुलतान पुरा.या भागात वीजपुरवठा बंद करण्यात आला होता.याच भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत,

दरम्यान तर आज सकाळी अमरावतीचे पालकमंत्री अनिल बोंडे यांनी मोर्शीत पूरग्रस्तांची पाहणी करून नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले

 सिंभोरा धरण परिसरातही अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे येत्या २४ तासात केव्हाही धरणाचे दरवाजे उघडल्या जाऊ शकते.मोर्शीत काल१४१मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर अप्पर वर्धा धरण 89 टक्के भरलं आहे,Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.