अमरावती - मेळघाट पर्यटनाला आलेल्या अमरावती येथील पर्यटकांच्या पुढ्यात विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यातील मोझरी पॉईंट येथे वीज कोसळली. यामध्ये पाच पर्यटक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पर्यटक घाबरले आहेत.
अचानक मुसळधार पावसाला सुरुवात
राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अमरावती शहरातील पर्यटक चिखलदरा येथे गेले होते. अचानक विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पर्यटकांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये किशोर मोतीराम साबळे (वय. 55) वैशाली किशोर साबळे (वय 26) वर्षे, आदित्य र जवंजाळ (वय 13) वर्ष सागर ठाकुर (वय 30) वर्ष, व ब्राह्मनवं नामक व्यक्तीही येथे वीज पडून जखमी झाली आहे. या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.