अमरावती : प्राचीन काळी बौद्धविहारे हे ज्ञानाची केंद्र होती. परंतु, काळाच्या ओघात बुद्ध विहारांवर मोठ्या प्रमाणात धर्मांधाची आक्रमणे झाले. त्यामुळे ही बौद्धविहारे नष्ट झाली. एकट्या बिहारमध्ये ८४ हजार बौद्ध विहारे होती असा, इतिहास आहे. आता पुन्हा नव्याने गावोगावी बौद्ध विहारे निर्माण झाली आहेत. बौद्ध विहारे ही ज्ञानाच्या कक्षेत यावीत. ती ज्ञानाची केंद्र व्हावी यासाठी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका नि:शुल्क अभ्यास चळवळ तसेच विहार जोडो समाज जोडो या संकल्पनेवर आधारित अभ्यासिकेची सुरवात पुण्यात करण्यात आली आहे. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेद्वारा भारतातील पहिला अभ्यास यात्रेचे राज्यभरात आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील भिडे वाडा येथून या अभ्यासाचे शुभारंभ झाला आहे. तसेच या यात्रेचा समारोप 29 जानेवारीला वर्धा जिल्ह्यात आर्वी येथे होणार आहे.
अभ्यास यात्रेचा असा राहील मार्ग : अमरावती जिल्ह्यातून अभ्यास यात्रेची सुरुवात दुपारी २ वाजता झाली. अभ्यासिकेचे 50 ते 60 विद्यार्थी , समन्वयक यांच्यासह ही अभ्यास यात्रा अंजनसिंगी सांगुलवाडा चांदुर रेल्वे मार्गाने मार्गक्रमण करून धामणगाव रेल्वे येथे मुक्कामी राहील. 27 जानेवारीला धामणगाव येथून यात्रा पुन्हा सुरू होऊन वरोरा, चंद्रपूर मार्गे सिंधीवाही येथे रात्रीच्या मुक्कामी पोहोचेल. 28 जानेवारीला शिंदेवाही इथून सकाळी आठ वाजता यात्रा पुढील प्रवासासाठी निघेल. ब्रह्मपुरी धारगाव शहापूर मार्गक्रमन करून रात्री नागपूर येथे मुक्कामी पोहोचेल.
विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क शिक्षणाची संधी : राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका ही गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देते. तसेच विहार तिथे अभ्यासिका हा उपक्रम राबविण्यात येते. आज दुपारी २ वाजता कलोती नगर येथून 60 ते 70 विद्यार्थी आणि समन्वयक यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ही अभ्यासात यात्रा चांदुर रेल्वे येथे रवाना झाली. अभ्यास यात्रेचे उद्घाटन केंद्रीय सीमा शुल्क विभागाचे सह आयुक्त डॉ. प्रशांत रोकडे आणि नगररचना विभागाचे पुणे येथील उपसंचालक विजय शेंडे यांच्या हस्ते पार पडले. सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड तथा अभ्यासिका समन्वयक तरुणा पाटील, प्रतिभा वरघट तथा समन्वयक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
29 जानेवारी सकाळी आठ वाजता नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून विद्यार्थी आणि समन्वयक यांना डॉक्टर प्रशांत रोकडे व विजय शेंडे मार्गदर्शन करतील. त्यानंतर ती अभ्यास यात्रा काटोल मार्गे आष्टी आणि आर्वी येथे समारोपिय कार्यक्रमासाठी प्रस्थान करतील. अभ्यास यात्रेचा समारोप वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे दुपारी ४ वाजता होणार असल्याचे अभ्यासिका समन्वयक सुरेंद्र मेश्राम यांनी सांगितले.
हेही वाचा - Sneha Kokane Criticized Dr Kayande : याला नंगानाच म्हणत नाही,बॉडी बिल्डर स्नेहा कोकणेंनी कायंदेंना सुनावले