ETV Bharat / state

अमरावतीच्या येवदा गावातील शेतकऱ्यांची बचत खाते अचानक बंद; शेतकरी आक्रमक - कर्जमाफी अमरावती

शेतकऱ्यांच्या बचत खात्यामधून जमा असलेली रक्कम विड्रॉल करण्याची प्रक्रिया पूर्ववत करण्यात यावी, याबाबत राज्यमंत्री बच्चु कडू तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी बँक अधिकाऱ्याला धारेवर धरले
शेतकऱ्यांनी बँक अधिकाऱ्याला धारेवर धरले
author img

By

Published : Oct 1, 2020, 5:08 PM IST

अमरावती - दर्यापूर तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून शेतकऱ्यांच्या थकित कर्जाच्या संलग्न बचत खात्यातील जमा असलेली रक्कम विड्रॉल करण्याची प्रक्रिया अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बचत खात्यात पैसे असून सुध्दा बँकेचे अधिकारी रक्कम विड्रॉल करीत नसल्याने शेतकऱ्यांनी प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदिप वडतकर यांना निवेदन दिले. प्रदीप वडतकर यांच्यासह शेतकऱ्यांनी येवदा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखाचे व्यवस्थापक प्रफुल साखरे यांना चांगलेच धारेवर धरले.

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना सन २०१९ नुसार सन २०१५ ते २०१९ पर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी घोषित करण्यात आली. कर्जमाफीची पूर्णपणे अंमलबजावणी न झाल्याने बऱ्याच प्रमाणात थकित शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत आलेले नाहीत. सरकारने कर्ज माफी योजने बाबत घोषणा केल्यामुळे थकीत शेतकरी पीक कर्ज भरण्यासाठी थांबले आहेत. थकीत खातेदार एम.पी.एम मध्ये गेलेले आहेत. त्यामुळे बँकेचे अधिकारी बचत खात्यातून रक्कम विड्रॉल करत नाहीत. यावर्षी शेतकऱ्यांच्या घरात येणारे मुख्य पीक मूग, उडीद, सोयाबीन अतिवृष्टीमुळे वाया गेली. सद्यस्थितीत रब्बी पिकाच्या हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना बी-बियाणे घेणे तसेच शेती मशागती करिता पैशाची आवश्यकता आहे. काही शेतकऱ्यांना आरोग्यसाठीसुद्धा पैसे काढता येत नसल्याने संकटाला सामोरे जावे लागत आहे.

शेतकऱ्यांच्या बचत खात्यामधून जमा असलेली रक्कम विड्रॉल करण्याची प्रक्रिया पूर्ववत करण्यात यावी, याबाबत राज्यमंत्री बच्चु कडू तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. बचत खात्यातून रक्कम विड्रॉल देण्याची प्रक्रिया पूर्ववत न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाने बँक शाखेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.