अमरावती - अतिवृष्टीमुळे जिल्यातील धामणगाव रेल्वे,चांदूर रेल्वे आदी भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले.यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून लवकर विमा भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.काही दिवसांपुर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी नुकसान पाहणी दौरा केला होता. Farmers waiting for compensation In Amrawati Distrivt त्यावेळी झालेल्या नियोजन भवनातील बैठकीत 23 ऑगस्टपर्यंत अधिसूचना काढून विमा भरपाई शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱयांसह स्थानिक प्रशासनाला दिले होते.यामध्ये एन.डी.आर.एफच्या निकषांबाहेर जाऊन मदत करा असे त्यांनी सांगितले होते.मात्र,जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापही याबाबत कोणताही अध्यादेश काढला नसल्याची माहिती आहे.
दर्यापूर तालुक्याला अतिवृष्टीटीचा सर्वाधिक फटका यामुळे,तातडीने विमा नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱयांमधुन केली जात आहे.जिल्ह्यात मुगाचे 7701 हेक्टर क्षेत्र आहे.यामध्ये,दर्यापूर तालुक्यात 7304 हेक्टर वर मुगाची पेरणी झालेली असून उडदाचे 100816 हेक्टर क्षेत्र आहे. दर्यापूर तालुक्याला अतिवृष्टीटीचा सर्वाधिक फटका बसला आहे.त्यामुळे पीक विम्याचा लाभ देण्याची मागणी जोरकसपणे पुढे येत आहे.
हेही वाचा - महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था गॅसवर, कोरोनानंतरही प्रशासन गंभीर नसल्याचे तज्ञांचे मत