ETV Bharat / state

Gurukunj Irrigation Scheme: गुरुकुंज उपसा सिंचन योजना कोरडीच! वंचित शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा - गुरुकुंज उपसा सिंचन योजना

आमदार यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांची महत्वाकांक्षी असलेली गुरुकुंज उपसा सिंचन (Gurukunj Irrigation Scheme) योजना पुन्हा एकदा कुचकामी झाल्याची दिसत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे पाणी अद्यापही न मिळाल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनी आक्रमक होत मुक्काम आंदोलनाचा इशारा (warn of agitation) दिला आहे.

Gurukunj Irrigation Scheme
गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या पाण्यापासुन वंचित शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
author img

By

Published : Nov 16, 2022, 5:19 PM IST

अमरावती: पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी पाणी मिळेल. रब्बीसाठी देखील पाणी देऊ, असे वारंवार जाहीर केले. शेतकऱ्यांनी कपाशी, तुरीसाठी पाण्याची वाट बघितली. तसेच रब्बीच्या पिकांची देखील पेरणी केली. परंतु, त्या शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही पाणी पोहोचलेच नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देण्याची कुंडी देखील मिळाल्या नाही.

काही शेतकऱ्यांच्या शेतात जे आऊटलेट दिले ते सखल भागात दिले. सखल भागातून पाणी उंच भागावर कसे पोहोचेल असा सवाल शेतकऱ्यांनी मुख्य अभियंता यांना विचारला असता या सगळ्या प्रश्नावर अधिकारी अनुत्तर झाल्याने शेतकरी पाणी प्रश्नावर आक्रमक झाले. सदर विभागाच्या सुचनेनुसारच त्यांनी शेतात रब्बीची पेरणी केली. आज शेतकऱ्यांचे पीक पाण्यावाचून धोक्यात आहे. उपस्थित शेतकऱ्यांनी मुख्य अभियंत्याला १७ तारखेचा अल्टीमेटम दिला आहे. शेतकरी १७ तारखेला मोझरी परिसरात मुक्काम आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

आ.यशोमती ठाकुर यांनी छेडले होते आंदोलन दरम्यान, तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पस्थळी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता माजी मंत्री यशोमती ठाकुर (MLA Yashomati Thakur) यांनी ठिय्या आंदोलन छेडले होते. प्रकल्पात झालेल्या लाखो रुपयांच्या चोरीच्या घटनेबाबत संताप व्यक्त करीत हे आंदोलन छेडण्यात होते.

लाखोंच्या साहित्याची झाली होती चोरी तिवसा जलसंपदा विभागांतर्गत (Tiwasa under Water Resources Division) अमरावती-नागपूर महामार्गालगत अप्पर वर्धाच्या मुख्य कालव्याच्या बाजूला गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या वॉटर लिफ्टिंगकरिता असणारी स्वतंत्र विद्युत पुरवठा यंत्रणा फोडून २९ ऑक्टोबरच्या रात्री लाखोंचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.