ETV Bharat / state

Amravati News: आगळावेगळा विवाह सोहळा; मुलीच्या लग्नात वऱ्हाडी मंडळींना दिली तब्बल २ हजार जलपात्रे भेट - आगळावेगळा विवाह सोहळा

अमरावतीच्या एका पक्षी मित्राने आपल्या मुलीच्या लग्नात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना एक आगळी वेगळी भेट दिली आहे. ती भेट म्हणजे पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याचे जलपात्र. हे जलपात्र देत असतानाच आपण या जलपात्रातून पक्षांना पिण्यास पाणी द्यावे, असे आवाहनही त्यांनी वऱ्हाडी मंडळींना केले. पक्षी मित्र असलेल्या अरुण सेवाने यांच्या पर्यावरण संवर्धन आणि पक्षी वाचवा या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Farmer and Bird lover
मुलीच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांना दिले जलपात्र
author img

By

Published : Feb 27, 2023, 11:35 AM IST

आगळावेगळा विवाह सोहळा

अमरावती: मुलीचं लग्न म्हटले की, सर्वप्रथम अनेकांच्या समोर येते ते आपल्या कुलदैवताचे नाव. आपल्या आजोबा पणजोबापासून परंपरेने चालत आलेल्या कुलदेवतांच्या नावाचा नाम उल्लेख लग्न पत्रिकेत सर्वप्रथम करण्यात येतो. परंतु अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी येथील पक्षीमित्र अरुण सेवाने यांनी कुलदैवताचे नाव न छापता त्या ठिकाणी पर्यावरण वाचवा असा मजकूर छापून एक चांगला संदेश दिला आहे. त्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. तब्बल 70 हजार रुपये खर्च करून त्यांनी दोन हजार जलपात्रे खरेदी करून त्यांनी मुलीच्या लग्न सोहळ्यात त्याचे वाटप केले आहे.

पर्यावरण वाचवण्याचा दिला संदेश: आपल्याला अभिप्रेत असलेले देव-दैवत किंवा संत यांचे नाव आणि फोटो यांचा प्रामुख्याने उल्लेख करून पत्रिका छापायची प्रथा आहे. त्या परंपरा फाटा देत त्यांनी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी येथील पक्षीमित्र अरुण सेवाने यांनी समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला. त्यांनी अन्न नासाडी थांबवा, झाडे लावा झाडे जगवा, तर दुसऱ्या बाजूला पक्षी वाचवा जंगल वाचवा, पाणी आडवा पाणी जिरवा ,अशा प्रकारचा संदेश दिला आहे.

देवतांच्या व संतांच्या फोटोला फाटा: लग्न पत्रिकेमध्ये कुलदैवतांचे फोटो आणि नावांना प्राधान्य देत पत्रिका छापल्या जातात. लग्नकार्य उरकल्यानंतर त्या पत्रिका कचऱ्यामध्ये जातात त्यावरील फोटोला पण अप्रत्यक्ष कचऱ्यात टाकल्या जाते. अशातच संतांच्या नावाची व फोटोची अव्हेलना होते. संतांची व कुलदैवत यांचे महात्म्य कायम राखता यावे यासाठीच पक्षीमित्र अरुण शेवाणे यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची लग्नपत्रिका छापताना त्या पत्रिकेवर कुठल्याही देवधर्माचे नाव किंवा फोटो किंवा संतांचे नाव किंवा फोटो यांना स्थान न देता, सरळसरळ पत्रिका पर्यावरणाला समर्पित केली आहे. फोटो व नावांच्या जागेवर सामाजिक संदेश प्रकाशित केले आहे.

मेहंदीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश: नवरीने दिला हातावरच्या मेहंदीतुन चक्क पर्यावरण संवर्धनाचा संदेश. प्रसिद्ध पक्षीमित्र अरुण शेवाणे यांनी आपल्या मुलीच्या विवाह पत्रिकेतून पर्यावरण जागृतीचा अनोखा प्रयत्न केला होता. या विवाह पत्रिकेला प्रतिसाद देत नवरी मुलगी निकिता हिने हातावर काढलेल्या विवाह मेहंदीत पर्यावरण संवर्धन काळाची गरज असा संदेश लिहून पक्षी व वृक्ष यांना स्थान देवून पर्यावरण संवर्धनासाठी वडिलांच्या अखंड सेवेच्या कार्यात सहभाग घेतला. तर यातून पर्यावरण निगडित कार्यात संपूर्ण कुटुंब खंबीरपणे पाठीशी उभे असल्याचे स्पष्ट दिसून येते.

पर्यावरण निगडित पहिला विवाह: विवाह सोहळ्यात मंडपात पर्यावरण संवर्धन निगडित उभारलेले संदेश फलक व पशु पक्षांना पाणी देण्याकरिता जलपात्राचा ढिगारा पाहून आदर्श शिक्षक सुधीर खोडे, माजी आमदार रमेशजी बुंदिले, अंजनगाव सुर्जी चे माजी नगराध्यक्ष ऑ. कमलकांतजी लाडोळे, प्रदीपदादा येवले, हैदरिया हायस्कूल कापूसतळणीचे मुख्याध्यापक मोहसीन अहेमद, ग्रा.प्र.कापूसतळणीचे सरपंच कु. अक्षता खडसे, ग्राविअ विजय कथलकर आदींनी विवाह पत्रिक व प्रत्यक्ष विवाह सोहळा पाहून प्रसिद्ध पक्षीमित्र अरुण शेवाणे यांच्या उत्कृष्ट विचारसरणीचे व नवरी मुलीच्या हातावरील पर्यावरण मेहंदीचे कौतुक केले. पर्यावरण निगडित महाराष्ट्रातील पहिला विवाह असल्याचे आपल्या भाषणातून प्रतिक्रिया दिल्या. पक्षी बचाव मोहीम यशस्वी होण्याकरिता विवाह विधिनंतर प्रत्येक पाहुण्यांना जलपात्र भेट देण्यात आले.

तब्बल 2 हजार जलपात्राचे वितरण: 2000 जलपात्रकरिता 70 हजार एवढा खर्च आला.अरुण शेवाणे हे शेतमजूर असून त्यांनी मुक्या पक्षांबद्दल दाखविलेल्या पक्षी प्रेमापोटी त्यांच्या या उत्कृष्ट विचारसरणीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा विवाह, विवाह पत्रिकेसह पर्यावरण प्रेमींसाठी अभिमानाची बाब ठरली असल्याची चर्चा होत आहे. एवढेच नाही तर आमच्या येथे राष्ट्रसंत, देशभक्त आणि महापुरुष याच्या प्रेरणेतून आणि तुमच्या शुभेच्छा व आशीर्वादाने प्रस्तुत मंगल कार्य करण्याचे आयोजित केले आहे. तरी मंगल प्रसंगी वधू वरास शुभ आशीर्वाद देण्यास आपल्याला निमंत्रित करताना मनापासून आनंद होतोय, तेव्हा या विवाह सोहळ्याप्रसंगी आपण उपस्थित रहावे, ही विनंती!असा मजकूर छापला होता.

सर्वच स्थरावरून कौतुक: पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञा घेण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. पक्षांना पाणी पाजण्यासाठी जलपात्र तयार केले असून या राष्ट्रीय कार्यात सहभागी प्रत्येक व्यक्तींना सेवाने परिवाराकडून पशुपक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलपात्र देण्यात भेट येणार आहे, अशी संकल्पना सामाजिक कार्यकर्ते तथा पक्षीमित्र अरुण शेवाने यांनी राबवली आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या पत्रिकेचे व विवाह निमित्ताने राबविलेल्या उपक्रमाचे सर्वच स्थरावत कौतुक केले जात आहे.

हेही वाचा: Swayambhu Hanuman Temple चांगापूर येथील हनुमान मंदिर पुरातन विहिरीला प्रदक्षिणा मारण्याचे आहे हे महत्व

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.