अमरावती : भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित, अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघासाठी (Graduate Constituency In Amravati) नव्याने मतदार नोंदणी करण्याच्या कार्यक्रमांतर्गत, दिनांक 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज स्विकारण्याची अंतिम (Extension of Voter Registration Program) तारीख आहे. Graduate Constituency Registration
तथापि, याच कार्यक्रमांतर्गत 23 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी झाल्यानंतर, दिनांक 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत पुन्हा अर्ज व हरकती स्विकारण्यात येणार आहे. तसेच यादरम्यान देखील पदवीधर मतदार संघाची मतदार नोंदणी करता येणार आहे.
दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरही, निरंतर मतदार नोंदणी निवडणूकीसाठी उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नोंदणी करता येईल. त्यानुसार सर्व पात्र पदवीधर मतदारांनी उक्त कालावधीमध्ये मतदार नोंदणी करावी, असे विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी कळविले आहे. Graduate Constituency Registration