ETV Bharat / state

Grampanchayat Elections: अमरावती जिल्ह्यातील २६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Grampanchayat Elections postponed) घेण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील एकूण २६३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत.

Grampanchayat Elections
अमरावती जिल्ह्यातील २६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर
author img

By

Published : Oct 3, 2022, 1:36 PM IST

अमरावती: जिल्ह्यातील १०६ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबरमध्ये तर १५७ ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरमध्ये संपणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणूका (Grampanchayat Elections postponed) घेतल्या जाणार होत्या. मात्र, ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूकीसाठी सुमारे २-३ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणेकरीता आवश्यक ते नियोजन आयोगाच्या (State Election Commission) स्तरावर करण्यात येत आहे.

प्रशासक नेमणार- (Administrators appointed on GramPanchayats) ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्याबरोबर ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत. मुदतीत निवडणुका घेण्याच्या दृष्टीने आतापर्यंत या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित व्हायला हवा होता. परंतु अद्यापही तसे झाले नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याबरोबरच तेथे प्रशासक नियुक्त करण्याच्या तयारीला वेग आला आहे.

या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात- (Term of GramPanchayat ends) सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असलेल्या सर्वाधिक २६ ग्रामपंचायती चिखलदरा तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल प्रत्येकी २४ ग्रामपंचायती मोर्शी, दर्यापूर व चांदूरबाजार तालुक्यातील असून अचलपूर, धारणी व वरुड तालुक्यातील प्रत्येकी २३ ग्रामपंचायती आहेत. चांदूररेल्वे आणि नांदगाव खंडेश्वरच्या प्रत्येकी १७, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १३, अमरावती व तिवसा तालुक्यातील प्रत्येकी १२, भातकुलीच्या ११ आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातील सर्वात कमी सात ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या सर्व ग्रामपंचायतींचा कार्यकाळ नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे त्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये पुढील काळात प्रशासकराज सुरू होईल. जिल्ह्यातील २६३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येण्यासोबतच तेथील सरपंच, उपसरपंचांसह १ हजार ९०८ ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळही संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पुढील कार्यकाळात या ग्रामपंचायतींचे कामकाज ग्रामसेवकांच्या सहकार्याने त्याठिकाणी नेमण्यात येणाऱ्या प्रशासकांकरवी पुढे नेले जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.