ETV Bharat / state

'हाता'च्या प्रचारासाठी एकवटलं 'घड्याळ' - सुलभा खोडके

अमरावती विधानसभा मतदारसंघात आघाडीकडून निवडणूकीच्या मैदानात उतरलेल्या सुलभा खोडके यांच्या प्रचारासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकवटले आहेत.

प्रचार सभा
author img

By

Published : Oct 15, 2019, 8:55 AM IST

अमरावती - विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवार आणि काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याऱ्या सुलभा खोडके यांच्या विजयासाठी 'हाता'चा प्रचार करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकवटले आहे. काल (सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सुलभा खोडके यांना बहुमताने निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला.

हेही वाचा - मुख्यमंत्री म्हणतात...तर राहुल गांधींची सभा आयोजित करा

अमरावतीच्या शेगाव नाका येथील अभियंता भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहरप्रमुख डॉ. गणेश खारकर यांच्या अध्यक्षतेत ही सभा पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र महल्ले यांनी आयोजित केली होती. बैठकीला आघाडीच्या उमेदवार सुलभा खोडके, माजी महापौर विलास इंगोले आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी, सर्वांनी विरोधकांवर सडकून टीका केली आणि विजय मिळविण्याचा निर्धार केला.

हेही वाचा - चांदूर रेल्वेतील अशोक महाविद्यालयात प्राध्यापकाला मारहाण; गुन्हा दाखल

Intro:अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुलभा खोडके यांच्या विजयासाठी पंजाचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकवटले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सुलभा खोडके यांना बहुमताने निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला.

Body:अमरावतीच्या शेगाव नाका येथील अभियंता भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहरप्रमुख डॉक्टर गणेश खारकर यांच्या अध्यक्षतेत ही सभा पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र महल्ले यांनी आयोजित केली होती. बैठकीला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुलभा खोडके, माजी महापौर विलास इंगोले आणि चरणजीतकौर नंदा, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे ,माजी नगरसेवक अर्चना इंगोले ,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या संगीता ठाकरे ,संतोष महात्मे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी विलास इंगोले यांनी संजय खोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहे आणि सुलभा खोडके यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे यामुळे एकाच घरात दोन्ही पक्ष असल्यामुळे अमरावती मतदारसंघातही ही आघाडी बळकट होऊन सुलभा खोडके यांच्या विजयासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करणार आहे. सुरेखा ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीत सुलभा खोडके या राष्ट्रवादी काँग्रेस सोडून बडनेरा मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार होत्या. मी सुद्धा पक्ष सोडून शिवसेनेत गेली होती आता मात्र आम्ही सर्व आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतलो आहोत सुलभा खोडके या अमरावती मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार असल्यातरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकजुटीने सुलभा खोडके यांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत. अमरावतीचे विद्यमान आमदार शहरात जी काही विकास कामे झाल्याचे सांगत आहेत ती सर्व विकासकामे ते काँग्रेसमध्ये असताना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राज्यात असताना झालेली आहेत. या पाच वर्षात मात्र एकही विकासाचे काम अमरावती शहरात झाले नाही. जे काही काँक्रिटचे रस्ते होत आहेत त्यामध्ये स्थानिक आमदाराचा कुठलाही वाटा नाही. शहराच्या आतील भागातील रस्ते मात्र खराब आहेत. कुठे विकास दिसत नाही. यामुळे आता अमरावती मतदारसंघात परिवर्तन होणे गरजेचे असून सुलभा खोडके यांच्या विजयाने अमरावती मतदारसंघात विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होईल असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उमटला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.