अमरावती : जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील (Nandgaon Khandeshwar taluka Amravati) 17 ग्रामपंचायतिच्या निवडणुकीसाठी सूचना प्रसिद्ध (Election announced) करण्यात आली आहे. यावेळी तालुक्यातील कोदोरी, माऊली चोर, चिखली वैद्य, सावनेर, शेलुगुंड, येवती, लोहगाव या ग्रामपंचायती मध्ये महिलांसाठी सरपंच पद आरक्षित असल्याने येथे महिला राज येणार असून; तालुक्यात 17 सरपंच तर 135 ग्रामपंचायत सदस्यासाठी (17 sarpanch 135 member posts) निवडणूक होणार आहे.
अशी आहे मतदारसंघ रचना : सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये तालुक्यातील 17 ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदासाठी निवडणूकिसाठी तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली आहे. दरम्यान कोदोरी, माऊली चोर, चिखली वैद्य, सावनेर, शेलुगुंड, येवती, लोहगाव महिलेसाठी राखीव आहे. तर कोदोरी, चिखली वैद्य, सावनेर, शेलुगंड, येवती, लोहगाव येथे सर्वसाधारण स्त्री तर माऊली चोर येथे नागरिकाचा मागास प्रवर्ग स्त्री व साखरा, पुसनेर, रोहणा, पाळा येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग तर खिरसाना वडाळा, काजना येथे सर्वसाधारण तर खेड पिप्री, पिंपळगाव बैनाई, भागुरा येथे अनुसूचित जाती असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये 135 ग्रामपंचायत सदस्यासाठी तर 17 सरपंच पदाची निवणुक होणार आहे .
सोमवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून; नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असून; त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर रोजी, तर मतमोजणी दोन दिवसांनी म्हणजेच 20 डिसेंबर रोजी होईल.
थंडीत राजकारण तापणार : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून याकडे लक्ष देत असल्याने, थंडीच्या गारव्यात सरपंच पदाचे राजकारण गावच्या पुढार्यांकडून चांगलेच तापवताना दिसत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यातील पुढारी सुद्धा आपली पोळी शेकण्याकरिता याकडे मोर्चे बांधणीच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले आहे व निवडणुकीच्या माध्यमातून विविध चर्चांना उधाण येत असून, यातून मागील गोष्टींना लक्षांत आणून मी कसा चांगला व त्याने काय केलं, अश्या विविध चर्चा रंगू लागल्या आहे. यातून थंडीच्या गारव्यात निवडणुकीचे राजकारण तापत असल्याचे चित्र सध्या तालुक्यातील 17 गावामध्ये दिसत आहे.
गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण : १) कोदोरी - सर्वसाधारण स्त्री, २) खिरासाना - सर्वसाधारण, ३) माऊली चोर - नामाप्र स्त्री,
४) साखरा - नामाप्र, ५) पुसनेर - नामाप्र, ६) चिखली वैद्य - सर्वसाधारण स्त्री, ७) वडाळा - सर्वसाधारण, ८) खेड पिंपरी - अनुसूचित जाती, ९) सावनेर - सर्वसाधारण स्त्री , १०) रोहणा - नामाप्र, ११) पिंपळगाव बैनाई - अनुसूचित जाती, १२) शेलगुंड - सर्वसाधारण स्त्री, १३) येवती - सर्वसाधारण स्त्री, १४) लोहगाव - सर्वसाधारण स्त्री, १५) काजना - सर्वसाधारण , १६) पाळा - नामाप्र
१७) भगुरा - अनुसूचित जाती.