ETV Bharat / state

मेळघाटात नव्या आठ प्रजातीच्या 'कलरफूल' बेडकांचा शोध - मेळघाटात बेडूक प्रजाती न्यूज

सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत असलेल्या मेळघाटातील जैवविविधता काही प्रमाणात दुर्लक्षित राहिली आहे. मात्र, आता विविध अभ्यासक मेळघाटात असलेल्या जैवविविधतेच्या अभ्यासाकडे वळले आहेत. शिवाजी विज्ञान महाविद्यालयात प्राणी शास्त्र विभागातील एका प्राध्यापकाने बेडकाच्या आठ नवीन प्रजातींचा शोध लावला आहे.

Frog
बेडूक
author img

By

Published : Aug 7, 2020, 12:27 PM IST

अमरावती - सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत असलेल्या मेळघाटात मागील चार वर्ष संशोधन करून एका प्राध्यापकाने आठ नव्या प्रजातीच्या बेडकांचा शोध घेतला आहे. गजानन वाघ, असे या प्राध्यापकाचे नाव आहे. वाघ यांनी मेळघाटच्या जंगलात फर्ग्युसन टोड, हिलक्रिकेट फ्रॉग, पॅन्ट क्लुओला, डोबसॉस, बॉरोविंग फ्रॉग या प्रजातीच्या बेडकांचा शोध लावला आहे.

मेळघाटात नव्या आठ प्रजातीच्या 'कलरफूल' बेडकांचा शोध

यापूर्वी 2005 मध्ये धुळतकर सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेने मेळघाटात विविध आठ प्रजातीच्या बेडकांचा शोध लावला होता. त्यात आता नव्याने आठ प्रजातींची भर पडली. त्यामुळे मेळघाटातील विविध प्रजातीच्या १६ बेडकांची नोंद झाली आहे.

प्रा. गजानन वाघ हे अमरावतीच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयात प्राणी शास्त्र विभागात कार्यरत आहेत. 'रेप्टाईल अ‌ॅमफिबियन कन्झर्वेशन नॅचरल हिस्ट्री' या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये विद्यार्थी हयात कुरेशी यांच्यासोबत एक शोधनिबंध 1 ऑगस्टला प्रकाशित केला आहे. या निबंधामध्ये त्यांनी मेळघाटामध्ये आढळलेल्या आठ प्रजातीच्या बेडकांची सूची दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.