अमरावती- परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 8 हजाराची मदत जाहीर केली. मात्र, एकूणच शेतीचे झालेले नुकसान पाहता करण्यात आलेली मदत ही तुटपुंजी आहे. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचा सूर सर्व क्षेत्रातून होत आहे.
हेही वाचा- ...आता येथून पुढे 'नो कॉमेंट्स' - अजित पवार
उसनवारी, व्याजाने पैसे काढत शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. मशागत करून पीक जोपासले. मात्र, ऐन काढणीच्या तोंडावर आलेल्या पावसाने तोंडचे आलेले पीक हिरावून घेतले. शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने याचे पंचनामे केले. मात्र, मदत करताना हात आकडता घेतला. हेक्टरी 8 हजार मदत करून शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. त्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज आहेत.