ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्याने पावसाअभावी आठ एकर कपाशीवर फिरवला ट्रॅक्टर

विदर्भात मान्सून वेळेवर दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरा केला. मात्र, आता पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर आले आहे.

अमरावती
अमरावती
author img

By

Published : Jul 1, 2021, 4:43 PM IST

Updated : Jul 1, 2021, 5:41 PM IST

अमरावती - हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून विदर्भामध्ये वेळेवर दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसनवार, कर्ज घेऊन पैसे उभे करत आपल्या शेतात घाईगडबडीने पेरणी केली. पण, पेरणीनंतर अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. यामुळे पिके कोमेजू लागले तर काही ठिकाणी पावसाआभावी बियाणे उगवलीच नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर आला आहे. त्यामुळे दर्यापूर तालुक्यातील येवदा परिसरातील हताश झालेल्या संतोष तिडके या शेतकऱ्याने आपल्या कपाशीवर ट्रॅक्टर फिरवला आहे.

आठ एकर कपाशीवर फिरवला ट्रॅक्टर

कर्ज काढून शेतात पेरणी केली. पण, दडी मारलेल्या पावसामुळे ते बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे आता दुबार पेरणी कशी करावी, असा प्रश्न संतोष तिडके यांच्या समोर उभा ठाकला आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची झाली आहे. काही शेतकऱ्यांची पेरणी पावासाआभावी रखडली आहे. पुरेसा झाला नाही अन् पेरणी झाली नाही तर हा हंगाम वाया जाण्याची चिन्हे आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.

कोरोनाकाळातही अमरावती विभागात 1 हजार 357 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

मागील 20 वर्षांपासून सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा दुर्दैवी ठपका बसलेल्या पश्चिम विदर्भात आजही शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. कोरोनाकाळातही पश्चिम विदर्भ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती विभागात 1 हजार 357 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

ही आहेत आत्महत्येची कारणे

शेतात पीक बहरले असताना अवकाळी पाऊस होणे आणि हातचे पिकं वाया गेल्याने अनेक शेतकरी खचून गेले. विभागातील महत्वाच्या सोयाबीन पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला. जे पिकं हाती आले त्यांना भाव न मिळाल्याने शेतीसाठी घेतलेलं कर्ज फेडणे, कुटुंबाचे पोषण करणे अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कोरोनाकाळात शेतकऱ्यांसमोरील संकट अधिक गडद झाले.

हेही वाचा - पेपर देण्यासाठी नेटवर्कच्या शोधात दुसऱ्या गावात पायी जात असलेल्या बहिणींवर रानडुकराचा हल्ला

अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा

Last Updated : Jul 1, 2021, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.