ETV Bharat / state

कोरोनामुळे शाळा पुन्हा ऑनलाइन.. मेळघाटच्या भूलोरी गावात मात्र चावडीवर भरणार शाळा - कोरोनामुळे शाळा पुन्हा ऑनलाइन

अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने 6 जानेवारीपासून ऑफलाईन शाळा (Due to corona school is online again)बंद केल्या आहेत. मेळघाटात इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या भुलोरी या गावात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत असणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना कोरोना नियमांतर्गत चावडीवर (Bhulori village of Melghat school start in Chawdi) बोलावून त्यांचा अभ्यास घेण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी घेतला आहे.

Melghat school start in Chawdi
Melghat school start in Chawdi
author img

By

Published : Jan 11, 2022, 3:37 PM IST

अमरावती - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने 6 जानेवारीपासून ऑफलाईन शाळा बंद (Due to corona school is online again) केल्या आहेत. मेळघाटात इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या भुलोरी या गावात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत असणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना कोरोना नियमांतर्गत चावडीवर बोलावून त्यांचा अभ्यास घेण्याचा (Bhulori village of Melghat school start in Chawdi) निर्णय मुख्याध्यापकांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे विद्यार्थी आणि पालकांनी स्वागत केले आहे.

शाळेत केवळ 93 विद्यार्थी -
चिखलदरा तालुक्यात येणार्‍या भूलोरी गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत एकूण 93 विद्यार्थी असून पहिल्या वर्गात 13 विद्यार्थी, दुसऱ्या वर्गात 8 विद्यार्थी, तिसऱ्या वर्गात 9 विद्यार्थी, चौथ्या वर्गात 10 विद्यार्थी, पाचव्या वर्गात 9 विद्यार्थी, सहाव्या वर्गात 19 विद्यार्थी, सातव्या वर्गात 13 विद्यार्थी आणि इयत्ता आठवी अकरा विद्यार्थी आहेत.

मेळघाटच्या भूलोरी गावात मात्र चावडीवर भरणार शाळा
पालक सभेची मान्यता -
सध्या स्थितीत मेळघाटात कुठेही कोरोना रुग्ण नाहीत. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढू नये याची खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मेळघाटात ऑनलाइन शिक्षण अशक्य असल्यामुळे अशा परिस्थितीत विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहू नये, यासाठी शाळेतील शिक्षक चावडीवर जाऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतील तसेच त्यांना काय अडचणी आहेत याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. शाळेचे मुख्याध्यापक रवी भुरुंबे यांनी यासंदर्भात पालक सभा बोलाविली होती. पालक सभेने मुख्याध्यापकांच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. शिक्षक चावडीवर येऊन प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे स्वाध्याय देतील आणि हा स्वाध्याय विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी घरून सोडवून आणून शिक्षकांना दाखवावा लागणार आहे, असा हा संपूर्ण उपक्रम असणार आहे.

हे ही वाचा - Corona Update : भारतात कोरोना रुग्णांमधे घट, 1.68 लाख नवीन रुग्णांची नोंद

कोरोना नियमांचे राखले जाणार भान -
कोरोना नियमांचे भान राखूनच विद्यार्थ्यांना शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. थर्मल मीटरद्वारे विद्यार्थ्यांचे तापमान दररोज तपासण्यात येणार आहे. ऑक्सी मीटरद्वारे विद्यार्थ्यांचे ऑक्सिजन प्रमाणही मोजले जाणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र भुरुंबे यांनी 'ईटीवी भारत 'शी बोलताना दिली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.