ETV Bharat / state

अमरावतीच्या शिरजगावाचा दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याचा निर्धार - शिरजगाव

चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा या गावातील हजारो ग्रामस्थांनी एकत्र येऊन गाव पाणीदार करण्यासाठी श्रमदान केले.

श्रमदान करताना गावकरी
author img

By

Published : May 9, 2019, 5:25 PM IST

अमरावती - दुष्काळी परिस्थितीवर कायमची मात करण्यासाठी चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा या गावाने पुढाकार घेतला आहे. आज या गावात हजारो ग्रामस्थांनी एकत्र येऊन गाव पाणीदार करण्यासाठी श्रमदान केले. यामध्ये दिव्यांग बांधवानी ही आपला सहभाग नोंदवला.

श्रमदान करताना गावकरी

पाणी वाचवा, पाणी जिरवा हा संदेश देत हे श्रमदान करण्यात आले. यामध्ये गावातील मुख्य नदीचे खोलीकरण होणार आहे. गावाबाहेरील छोट्या मोठ्या नाल्याचे कामही या माध्यमातून होणार आहे. आज गाव विकास समितीच्या वतीने हे महाश्रमदान पार पडले. यावेळी मेघा नदीमधील गाळ काढण्यात आला. विशेष म्हणजे या करता गावकऱ्यांनी सार्वजनिक वर्गणी काढत तब्बल १० लाख रुपये जमा केले. श्रमदान कार्यक्रमात जिल्ह्यातील आणि तालुक्यातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:अमरावतीच्या शिरजगाव कसब्यात तुफान आलं या.

गावकऱ्यांच्या सार्वजनिक गाववर्गणीतून गाव होणार पाणीदार
----------------------------------------------
अमरावती अँकर
दुष्काळी परिस्थिती वर कायमची मात करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा या गावाने पुढाकार घेतला असून गावातील लोकांनी केलेल्या लोक वर्गनीतून तबल दहा लाख रुपये गोळा झाले असून आज या गावात हजारो ग्रामस्थांनी एकत्र येऊन गाव पाणीदार करण्यासाठी सकाळपासूनच श्रमदान केले.या मध्ये दिव्याग बांधवानी ही महाश्रदानात हातभार लावला.

पाणी वाचवा ,पाणी जिरवा हा संदेश देत हे श्रमदान करण्यात आले .यामध्ये गावातील मुख्य नदीचे खोलीकरण होणाऱ आहे.गावाबाहेरील छोट्या मोठ्या नाल्याचे कामही या माध्यमातून होणार आहे .आज माझं गाव विकास समितीच्या वतीने हे महाश्रमदान पार पडले यावेळी मेघा नदीमधील गाळ काढन्यात आला. विशेष म्हणजे या करिता गावकऱ्यांनी सार्वजनिक वर्गणी करीत तब्बल 10 लाख रु जमा केले.श्रमदान कार्यक्रमात जिल्ह्यातील व तालुक्यातील अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होतेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.