ETV Bharat / state

Amravati Graduate Election : कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर यश नक्की मिळेल - रणजित पाटील - रणजित पाटील

सध्या अमरावती पदवीधर निवडणूक जोरदार चर्चेत आहे. डॉ. रणजित पाटील हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तिसऱ्यांदाही विजयाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे आणि त्यांच्या संवाद आणि संपर्काच्या जोरावर यशाचे फळ नक्की मिळेल असे रणजित पाटील यांनी म्हटले आहे.

Amravati Graduate Election
डॉ. रणजित पाटील
author img

By

Published : Jan 30, 2023, 2:09 PM IST

कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर यश नक्की मिळेल

अकोला : पहिल्या निवडणुकीत जेवढे मताधिक्य घेतले होते. त्यापेक्षा दुसऱ्या निवडणुकीत मला जास्त मिळाले. आता मी तिसऱ्यांदा या निवडणुकीला सामोरे जात आहे. मला पूर्ण विश्वास आहे, की आमच्या नेतृत्वाच्या आधारावरती, आमच्या कार्यकर्त्यांच्या कामावरती आणि मी केलेला संवाद आणि संपर्काच्या जोरावर निवडणूक जिंकू, असे रणजित पाटील म्हणाले. अमरावती पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत मतदान करण्यासाठी आरडीजी मतदान केंद्रावर भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील हे आले असता माध्यमांशी ते संवाद साधत होते. तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले.

दीड वर्षापासून तयारी करतोय : मी तिसरी निवडणूक लढवत आहे आणि या निवडणुकीची तयारी गेली दीड वर्षापासून आम्ही करतोय. तसे तर निवडणुकीला फक्त निवडणुकीच्या दिवशी समोरे जायचे नसते. ज्या दिवशी तुमची निवडणूक संपते, त्याच दिवसापासून तुम्हाला पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागावे लागते. मी त्याच पद्धतीने काम करत आलो आहे. मला असे वाटते की माझी स्पर्धा ही माझ्याशीच आहे, असे म्हणत भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांनी विरोधकच नसल्याचे आज प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले आहे.

काळ, काम आणि वेगाचे सूत्र : युद्ध हे युद्ध असते. आपली तयारी आपण करायची असते. काळ, काम आणि वेगाचे सूत्र हे प्रत्येकाला बांधले गेलेले असते. त्यामध्ये तुमचे नियोजित काम हे माईलस्टोनप्रमाणे करत गेले, तर त्या प्रयत्नांचे फळ प्रत्येकाला मिळते. असे डॉ. रणजित पाटील यांनी म्हटले. समर्थक हे भाजपचे असतात असे नसते. उमेदवारी एकदा मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना असेल आरपीआय आठवले गट आणि मित्र पक्ष यांचा एकदा उमेदवार ठरल्यानंतर मग पार्टी लाईन सोडून दुसरे काही चालत नाही. याचा अनुभव आणि प्रत्यय आपल्याला प्रत्येक निवडणुकीच्यानंतर येतो असे डॉ. रणजित पाटील यांनी म्हटले. माझी पहिल्या आणि दुसऱ्या निवडणूकीच्या वेळी काही वेगळे झाले नव्हते. आताची तिसरी निवडणूक असेल यावेळेलाही काही वेगळे झाले नाही. असे मत डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी मांडले.

डॉ. रणजीत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल : डॉ. रणजीत पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश भवन येथे आयोजित मेळाव्यात डॉक्टर रणजीत पाटील यांच्या विजयासाठी आवाहन करणारी भाषणे देण्यात आली होती.

हेही वाचा :CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी बोलावली सह्याद्रीवर आज सर्वपक्षीय खासदारांची बैठक; होणार संसदीय अधिवशेनावर चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.