अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता म्हणून डॉ. एफ.सी. रघुवंशी यांची नियुक्ती वादग्रस्त ठरत आहे. मात्र, असे अशा परिस्थितीतही त्यांच्याकडे प्रभारी कुलगुरुपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामुळे विद्यापीठातील या अजब प्रकारची चर्चा रंगली आहे.
कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंना कोरोनाची लागण -
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर आणि प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कुलगुरूंच्या गैरहजेरीत कुलगुरू पदाचा प्रभार प्र-कुलगुरूंना सोपविता येतो. प्र-कुलगुरू नसतील तर 2016 विद्यापीठ कायद्यानुसार अधिष्ठाता किंव्हा वरिष्ठ प्राध्यापकांना कुलगुरुंचा प्रभार सोपविता येतो. यामुळे अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी आपल्या पदाचा प्रभार डॉ. एफ.सी. रघुवंशी यांना सोपविला.
हेही वाचा - अमरावती महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचे 'डमरू बजाओ' आंदोलन
डॉ. एफ. सी. रघुवंशी यांच्या अधिष्ठाता पदावर आक्षेप -
2016च्या विद्यापीठ कायद्यात कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव यांच्यानंतर अधिष्ठाता पदाला महत्त्व आहे. एकूण चार अधिष्ठाता पदांपैकी दोन निवडून आलेले आणि दोघे मुलाखत प्रक्रियेद्वारे कुलगुरुंनी नियुक्त केलेले महाविद्यालयातील प्राचार्य असणे, हे कायद्यानुसार बंधनकारक आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि मानव विज्ञान विद्याशाखा या दोन विद्यशाखांच्या अधिष्ठाता पदासाठी 2019मध्ये जाहिरात देण्यात आली होती. मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता पदावर महिला महाविद्यालय अमरावतीचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील यांची नियुक्ती कुलगुरूंनी केली. तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता पदावर विद्याभारती महाविद्यालय अमरावती येथून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य डॉ. एफ.सी. रघुवंशी यांची नियुक्ती जून 2019मध्ये करण्यात आली.
दरम्यान, अधिष्ठाता पदासाठी एखाद्या महाविद्यालयात प्राचार्य असणाऱ्या व्यक्तीचीच नियुक्ती करणे, असे कायद्यात नमूद असताना डॉ. एफ.सी. रघुवंशी यांची कुलगुरूंनी नियुक्ती केली. विशेष म्हणजे निवड समितीत शासनाचे प्रतिनिधी असणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंडळाचे तत्कालीन सहसंचालक जगताप यांनी डॉ. रघुवंशी यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. विशेष म्हणजे अधिष्ठाता पदावर असणाऱ्या व्यक्तीला दरमहा दिले जाणारे अडीच ते तीन लाख रुपये वेतन अपात्र असणाऱ्या डॉ. रघुवंशी यांना देण्यास उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालकांनी मान्यताच दिली नाही.
हेही वाचा - अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर गहू उध्वस्त
विद्यापीठाला युजीसीच्या पत्राचा विसर -
मार्च महिना हा अत्यंत महत्त्वाचा महिना असताना विद्यपीठात कुलगुरू आणि प्र-कुलगुरू ही दोन्ही पद रिक्त असणे योग्य नाही. मात्र, दोन्ही व्यक्ती आजारी आहेत. असे असताना कुलगुरुंनी अशा व्यक्तीकडे प्रभार सोपविला ज्यांची अधिष्ठाता म्हणून नियुक्तीच वादग्रस्त आहे, असे सिनेट सदस्य आणि 'नूटा' अर्थात नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. आणखी गंभीर बाब म्हणजे युजीसीचे 9 मार्च 2002रोजी देशातील सर्व विद्यापीठांच्या कुलसचिवांना एक पत्र दिले होते. या पत्रात सेवानिवृत्त झालेल्या कोणत्याही प्राध्यावकाला विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकारणावर नियुक्त करू नये, असे स्पष्टपणे बजावले आहे. आपल्या विद्यापीठाला युजीसीच्या पत्राचा विसर पडला असेल. मात्र, आमच्याकडे आजही हे पत्र उपलब्ध आहे, असे डॉ. प्रवीण रघुवंशी म्हणाले.
डॉ. एफ. सी. रघुवंशी यांची विनावेतन सेवा -
डॉ. एफ.सी. रघुवंशी यांचे अधिष्ठाता पद वादग्रस्त असल्याने त्यांना त्यांना वेतन देण्यास उच्चशिक्षण सहाय्यक संचालक कार्यालयाने आक्षेप घेतला आहे. त्यांच्या वेतनाबाबत विद्यापीठाच्या आर्थिक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना आजवर कुठलेही वेतन देण्यात आले नाही. असे असले तरी विद्यापीठाच्या सामान्य कोषात जमा विद्यार्थ्यांच्या विविध शुल्कातून वसूल होणाऱ्या पैशातून डॉ. एफ. सी. रघुवंशी यांना भविष्यात त्यांच्या सेवेची थकीत रक्कम दिली जाऊ शकते, असेही बोलले जात आहे.