अमरावती - राज्यात सध्या कोरोनाची रुग्ण संख्या ही कमालीची घटली आहे. लॉकडाऊनमध्येही शिथिलता मिळाली आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. कोरोनाची अशीच परिस्थिती राहिली तर शाळा सुरू करायला हरकत नाही. जर पुन्हा कोरोनाचा प्रभाव वाढला तर शाळा बंद देखील कराव्या लागतील. अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री मंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
शिक्षण पून्हा होऊ शकते पण...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षापासून राज्यातील शाळा महाविद्यालये बंद आहेत. आता शाळा महाविद्यालय सुरू करावी अशी मागणी देखील पालक वर्गाकडून केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेच. पण आता जर पुन्हा त्या गावात प्रभाव वाढला तर अडचणी निर्माण होऊ शकते. शिक्षण पून्हा होऊ शकते पण गेलेला माणूस पुन्हा येऊ शकत नाही असेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.
शाळा सुरू करण्याची तयारी झालेली -
शाळा सुरू करण्यासाठी जी काही तयारी करावी लागते. ती तयारी शिक्षण विभागाने केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळाचे बैठक घेऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतील. असेही बच्चू कडू म्हणाले.
हेही वाचा - दोन दिवसांत बारावी परीक्षांच्या मुल्यमापनाचे धोरण जाहीर होणार