ETV Bharat / state

अमेझॉनवरुन 35 हजारांच्या कॅमेऱ्याऐवजी आले 'बॉडी स्प्रे'

अमेझॉनवरुन 35 हजारांच्या कॅमेऱ्याऐवजी पाच बॉडी स्प्रे आल्याने एका डॉक्टराची फसवणूक झाली आहे. त्यांनी याबाबत अमेझॉनकडे तक्रार दिल्यानंतरही आम्ही काहीही करू शकत नाही, असे म्हणत अमेझॉनने हात वर केले आहेत.

स्प्रे
स्प्रे
author img

By

Published : Mar 2, 2021, 4:43 PM IST

अमरावती - अमेझॉन या ऑनलाइन खरेदी संकेतस्थळावरून 38 हजारांचा कॅमेरा मागवला होता. पण, पार्सलमध्ये बॉडी स्प्रे पाठवून कंपनीकडून फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार धामणगाव रेल्वे शहरातील डॉ. असित पसारी सोबत घडला आहे.

माहिती देताना अमेझॉनचे ग्राहक

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातील डॉ. असित पसारी यांनी अमेझॉनवरुन 38 हजारांच्या कॅमेऱ्याची ऑर्डर दिली होती. योग्य कालावधीनंतर स्थानिक वितरण प्रतिनिधी पंकज काळबांडे यांनी डॉ. असित पसारी यांना अमेझॉन कंपनीचे पार्सल आणून दिले. डॉ.पसारी यांनी लगेच पार्सल उघडले. त्यामध्ये कॅमेऱ्याऐवजी 5 बॉडी स्प्रे निघाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पसारी यांनी अमेझॉनच्या ग्राहक संपर्क केंद्राशी संपर्क साधून तक्रार नोंदविली. चौकशी करून सांगतो, असे ग्राहक केंद्राने सांगितले.

कंपनीने केले हात वर

दुसऱ्या दिवशी कंपनीचा वितरण प्रतिनिधी काळबांडे यांनी डॉ. पसारी यांच्याशी संपर्क साधून पार्सल उघडतांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे व्हिडीओ नेले. त्यानंतर पाच दिवसांच्या चौकशीनंतर कंपनीने आम्ही काहीही करु शकत नाही म्हणाले. तसेच पार्सल परत घेणार नाही व परतावाही देणार नसल्याचे म्हणत अमेझॉनने हात वर केल्याचे डॉ. पसारी म्हणाले.

हेही वाचा - टाळेबंदीला विरोध दर्शवत दुकाने उघडणाऱ्यांवर गुन्हे दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.