अमरावती - राज्यात कोरोनाचे संकट आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताचे काम हे गेले आहे. ज्या लोकांचे हातावर पोट आहे, त्या लोकांच्या घरी चूल पेटनार की नाही याची शाश्वती नाही. म्हणून संपूर्ण विदर्भात समाजसेवेचे काम करणाऱ्या दिनबंधू शिक्षण सामाजिक संस्थेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आज अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी व गुरुदेव नगर येथील शेकडो गोरगरीब कुटुंबाना धान्य व किराणा वाटप करण्यात आले.
'जमेल तशी मदत करताेय'
आम्ही या कोरोना काळात दुःखी व कष्टी लोकांचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न करीत आहोत. जमेल तशी मदत हीच खरी ईश्वरसेवा आहे. ईश्वर माणसाच्या सेवेतच आहे. तुम्ही मायबाप माझा खरा चर्च आहात. आपल्या सर्वांच्या कुटुंबात सुखी शांती नांदो यासाठी आपली प्रार्थना निसर्ग प्रभू मान्य करेल, अशी प्रार्थना यावेळी या संस्थेच्या वतीने करण्यात आली. या कार्यक्रमाला दिनबंधू शिक्षण सामाजिक संस्थेचे नितीन सरदार, ज्ञानेश्वर रक्षक, अभिजीत पगारे, मोझरी येथील सरपंच, सुरेंद्र भिवंगडे, रवी मानव, प्रशांत सुरोसे,अनुप देशमुख, छाया मानव उपस्थित होते.
हेही वाचा -राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्री घेणार आज बैठक