अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातील धवणेवाडी आंबेडकर नगर या परिसरातील प्रथम एका 21 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिची आई व दोन बहिणींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे सर्व चारही रुग्ण सावंगी मेघे येथे दाखल होते. त्यांची 14 दिवसांनंतर चाचणी घेण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती वर्ध्याचे जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी दिली. या चारही रुग्णांना आज सायंकाळी सुट्टी देण्यात येणार आहे.
जळगाव आर्वी येथीलही संबंधित महिलेचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे धामणगाव तालुका पूर्णतः कोरोनामुक्त झाला आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. घरी सुरक्षित राहावे, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे यांनी केले आहे.