ETV Bharat / state

वनअधिकारी दीपाली चव्हाण यांची आत्महत्या, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला अटक - दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण आरोपी अटक

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक पत्र लिहून वरिष्ठांवर अनेक आरोप केले आहेत.

Deepali Chavan suicide case
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
author img

By

Published : Mar 26, 2021, 12:53 PM IST

Updated : Mar 26, 2021, 2:48 PM IST

अमरावती - मेळघाटातील हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. वरिष्ठांनी त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची चिठ्ठी पोलिसांनी मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला नागपूर रेल्वे स्थानकावर अटक केली आहे.

दिल्ली-बंगळुरू एक्सप्रेसने काढणार होता पळ -

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हा आरोपी आहे. तो शुक्रवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावरून दिल्ली-बंगळुरू या गाडीने पळण्याच्या तयारीत होता. त्याच्या मागावर असणारे अमरावती ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय व त्यांच्या चमूने लोहमार्ग पोलीस योगेश घुरडे, पप्पू मिश्रा, प्रवीण खडसे यांच्या मदतीने शिवकुमारला अटक केली.

मूळच्या साताऱ्याच्या

मूळच्या साताऱ्याच्या असणाऱ्या दीपाली चव्हाण या 2014मध्ये राज्य सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन वन विभागात रुजू झाल्या होत्या. त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून धुळघट रेल्वे येथे पहिली नियुक्ती मिळाली होती. 2019 मध्ये त्यांची हरिसालला बदली झाली. हरिसाल वनपरिक्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांच्या पुनर्वसनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांच्याकडे वनपाल, वनमजूर असा पुरेसा कर्मचारी वर्ग नसतानाही त्यांनी 'मांगीय' या गावचे पुनर्वसन केले. यादरम्यान आदिवासी बांधवांनी त्यांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांनी याबाबत विनोद शिवकुमारला माहिती दिली. मात्र, त्या खोटे बोलत असल्याचा आरोप करत दीपाली यांची मदत केली नाही. आदिवासी बांधवांच्या तक्रारीवरून दिपाली चव्हाण यांच्यावर अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्यावेळी देखील शिवकुमारने मदत केली नाही.

असा करायचा अपमानित

याशिवाय शिवकुमार रात्रीला गस्ती दरम्यान चव्हाण यांनी कुठेही बोलवून असभ्य बोलायचा. त्यांचे म्हणणे न ऐकल्यास हरीसालला आल्यावर कर्माचाऱ्यांसमोर तो चव्हाण यांना अपमानित करायचा. शिवकुमारच्या मर्जीने वागत नसल्याने दीपाली यांचे वेतन देखील रोखण्यात आले, मानसिक छळ केला. गर्भवती असताना घरी जाण्याची परवानगीही फेटाळून लावली होती, असे विविध आरोप दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात शिवकुमार विरोधात केले आहेत.

हेही वाचा - मेळघाट; हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दिपाली चव्हाण यांची आत्महत्या

Last Updated : Mar 26, 2021, 2:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.