अमरावती - अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात पिंगळाई नदीत एका ३७ वर्षीय व्यक्तीचा नदीपात्रात संशयास्पद मृतदेह आढळून आला. या घटनेची वार्ता शहरात पसरताच नागरिकांनी नदीकाठी मोठी गर्दी केली होती.
किशोर रामराव बिजवे असे मृत व्यक्तीचे नाव असून ते तिवसा प्रभाग क्रमांक १३ येथील रहिवाशी आहेच. आज सकाळी बाजारपेठ जवळ नदी पात्रात काही लोकांना मृतदेह दिसून आला. या घटनेची माहिती तिवसा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी तिवसा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. मृत व्यक्ती शेत मजुरीचे काम करत होते. मात्र ही हत्या की आत्महत्या असा संशय नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मृत किशोर बिजवे यांच्या पाश्चत आई, पत्नी, एक लहान मुलगा, मुलगी असा परिवार आहे. यावेळी तिवसा पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास ठाणेदार रिता उईके यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.