अमरावती : काही समाजकंटक मंडळी हिंदू मुस्लिम समुदायामध्ये जाणीवपुर्वक तेढ निर्माण करणाऱ्या बातम्या आपल्या कानावर पडत असतात. पण अचलपूरमधून एक सुखावणारी बातमी आली ( Navratri 2022 ) आहे. जिल्ह्यातील अचलपूर येथे मुस्लीम समुदायाची अंत्ययात्रा दांडिया सुरू असलेल्या ठिकाणाहून जाणार असल्याचे कळताच रंगात आलेला दांडिया अंत्ययात्रेसाठी थांबवला ( Dandiya stopped for funeral procession ). संस्थानच्या या कौतुकास्पद कृतीमुळे पुन्हा एकदा हिंदू - मुस्लिम ऐक्याची प्रचिती ( Hindu Muslim unity ) आली.
हिंदू संस्कृती आणि परंपरा : हिंदू संस्कृती आणि परंपरेने घालून दिलेला आदर्श आजही अबाधित असल्याचे प्रचिती जिल्ह्यातील दंगलग्रस्त म्हणून प्रसिद्ध असलेल्या अचलपूर येथे आली. अचलपूर सरमसपुरा येथील श्री जगदंबा देवी संस्थांन परिसरातील नौवरात्र दांडिया सुरू असतानाच मुस्लिम समाजातील एका व्यक्तीची अंत्ययात्रा तिथून येत असल्याची माहिती मिळताच विजय महाराज भुजाडे यांना क्षणाचाही विलंब न करता आदेश देत रंगात आलेला दांडिया थांबवत माणुसकी आणि सभ्यतेचा परिचय देत दोन धर्मातील सलोख्याची अनुभूती उपस्थितांना करुण दिली.
ऐतिहासिक पार्श्वभूमी : अचलपूर सरमसपुरा येथील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या श्री जगदंब देवी संस्थानमध्ये ( Shri Jagdamba Devi Institute ) नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्री जगदंब देवी आखाड्याचे संचालक अजय भुजाडे व मनोज भुजाडे यांच्या नेतृत्वात येथे दांडिया सुरू होता. दांडियाचे दोन राउंड झाल्यानंतर सुमारे नऊ वाजताच्या दरम्यान परिसरातील एका मुस्लिम व्यक्ती चा मृत्यू होऊन त्याची अंतयात्रा दांडिया मंडपाजवळ जात असल्याची माहिती मिळताच आखाड्याचे प्रमुख श्री विजय महाराज भुजाडे यांनी आदेश देत रंगात आलेला दांडिया थांबवत धार्मिक सलोख्याचा परिचय दिला.
सांस्कृतिक योगदान : सरमसपुरा येथील जगदंबा देवी आखाडा हा कला क्रीडा व सांस्कृतिक योगदान देत आहे. मागील अनेक वर्षापासून या आखाड्याच्या माध्यमातून योगा दांडिया लेझीम कबड्डी कुस्ती या खेळांना प्रोत्साहन देत युवक व युवतींना निशुल्क मार्गदर्शन करण्यात येते. आखाड्याचे प्रमुख विजय महाराज भुजाडे यांनी युवकांना व्यसनापासून दूर ठेवत सुदृढ व निरोगी आयुष्य लाभाव यासाठी ते सतत काम करत करतात.
हिंदू मुस्लिम ऐक्याचा परिचय : हिंदू संस्कृती आणि परंपरेने घालून दिलेला आदर्श आजही अबाधित असल्याचे प्रचिती जिल्ह्यातील दंगलग्रस्त म्हणून प्रसिद्ध असलेल्या अचलपूर येथे आली. अचलपूर सरमसपुरा येथील श्री जगदंबा देवी संस्थांन परिसरातील नौवरात्र दांडिया सुरू असतानाच मुस्लिम समाजातील एका व्यक्तीची अंत्ययात्रा तिथून येत असल्याची माहिती मिळताच विजय महाराज भुजाडे यांना क्षणाचाही विलंब न करता आदेश देत रंगात आलेला दांडिया थांबवत माणुसकी आणि सभ्यतेचा परिचय देत दोन धर्मातील सलोख्याची अनुभूती उपस्थितांना करुण दिली.
विजय महाराज भुजाडे यांचा पुढाकार : अचलपूर सरमसपुरा येथील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या श्री जगदंब देवी संस्थान मध्ये नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्री जगदंब देवी आखाड्याचे संचालक अजय भुजाडे व मनोज भुजाडे यांच्या नेतृत्वात येथे दांडिया सुरू होता. दांडियाचे दोन राउंड झाल्यानंतर सुमारे नऊ वाजताच्या दरम्यान परिसरातील एका मुस्लिम व्यक्ती चा मृत्यू होऊन त्याची अंतयात्रा दांडिया मंडपाजवळ जात असल्याची माहिती मिळताच आखाड्याचे प्रमुख श्री विजय महाराज भुजाडे यांनी आदेश देत रंगात आलेला दांडिया थांबवत धार्मिक सलोख्याचा परिचय दिला.
संस्थानचे कार्य प्रेरणादायी : सरमसपुरा येथिल जगदंबा देवी आखाडा हा कला क्रीडा व सांस्कृतिक योगदान देत आहे मागील अनेक वर्षापासून या आखाड्याच्या माध्यमातून योगा दांडिया लेझीम कबड्डी कुस्ती या खेळांना प्रोत्साहन देत युवक व युवतींना निशुल्क मार्गदर्शन करण्यात येते. आखाड्याचे प्रमुख विजय महाराज भुजाडे यांनी युवकांना व्यसनापासून दूर ठेवत सुदृढ व निरोगी आयुष्य लाभाव यासाठी ते सतत काम करत करतात.