ETV Bharat / state

Achalpur Violence : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडासह चार ठिकाणी संचारबंदी, परिसराला छावणीचे रूप - अमरावती अचलपूर हिंसाचार

अचलपूर शहरात रविवारी रात्री दुल्हा गेटवर ( Achalpur Violence )  झेंडा फडकवण्याचा वादावरून दोन गटात दगडफेक झाली. त्यामुळे अचलपूर, परतवाडा, कांडलीसह ( Curfew In Achalpur ) लगतच्या एका गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Achalpur Violence
Achalpur Violence
author img

By

Published : Apr 18, 2022, 4:06 PM IST

Updated : Apr 18, 2022, 4:35 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील अचलपूर शहरात रविवारी रात्री दुल्हा गेटवर ( Achalpur Violence ) झेंडा फडकवण्याचा वादावरून दोन गटात दगडफेक झाली. त्यामुळे अचलपूर, परतवाडा, कांडलीसह लगतच्या एका गावात संचारबंदी ( Sec 144 Impose In Achalpur ) लागू करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया

पोलिसांनी केले शांतता राखण्याचे आव्हान - सध्या संचारबंदी असणाऱ्या अचलपूर, परतवाडा, कांडली या परिसरात शांतता आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन पोलीस उपाधीक्षक शशिकांत सातव यांनी केले आहे.

अचलपूर-परतवाड्याला पोलीस छावणीचे स्वरूप - रविवारी रात्री अचलपूर शहरात दोन गटात तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी आहे. या घटनेनंतर संचारबंदी घोषित करण्यात आली असून अचलपूर, परतवाडा, कांडली या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

भाजपा कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात - अचलपूर आणि परतवाडा येथील सध्याची परिस्थिती पाहता कलम १४४ करण्यात आली आहे. असे असताना अचलपूर ला जाण्यासाठी निघाले भाजपच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी आणि प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कलम 144 अंतर्गत ताब्यात घेतले आहे. भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आसेगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई करण्याची शक्यता आहे.

नवनीत राणांचे शांततेचे आवाहन - अचलपूर शहरात (Achalpur Violence) रविवारी रात्री दोन गटात तणाव निर्माण होऊन दगडफेक झाल्यामुळे खळबळ उडाली. या घटनेमुळे अचलपूर, परतवाडा येथे संचारबंदी घोषित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी जिल्हावासियांनी शांतता राखावी, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. खासदार नवनीत राणा मंगळवारी अचलपूरचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन नेमकी वस्तुस्थिती खासदार नवनीत राणा जाणून घेणार आहेत. जिल्ह्यात सामाजिक शांतता राहावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, सर्व धर्मीय बांधवांनी जिल्ह्यात कुठेही तणाव निर्माण होणार नाही याबाबत दक्षता बाळगावी, असेही खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Sanjay Raut On INS : 'राज भवनाच्या दिशेने निघालेल्या पैशांना मध्ये कुठे पाय फुटले हे लवकरच समोर येईल' - संजय राऊत

Last Updated : Apr 18, 2022, 4:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.