ETV Bharat / state

अमरावती : कोरोना संदर्भातील निर्बंध शिथील होताच बाजारपेठेत नागरिकांची गर्दी - अमरावती कोरोना बातम्या

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आज तीन महिन्यांनंतर बाजारपेठा उघड्या करण्यात आल्या आहेत. मात्र, दुकाने उघडताच बाजारेपेठेत नागरिकांची गर्दी उसळल्याचे बघायला मिळाले.

Crowds of people in amravati
अमरावती : कोरोना संदर्भातील निर्बंध शिथील होताच बाजारपेठेत नागरिकांची गर्दी
author img

By

Published : Jun 1, 2021, 4:02 PM IST

Updated : Jun 1, 2021, 4:29 PM IST

अमरावती - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावती शहरातील बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आज तीन महिन्यांनंतर बाजारपेठा उघड्या करण्यात आल्या आहेत. मात्र, दुकाने उघडताच बाजारेपेठेत नागरिकांची गर्दी उसळल्याचे बघायला मिळाले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचादेखील फज्जा उडाला होता.

रिपोर्ट

रस्त्यांवर आज अमरावतीकरांची गजबज -

तीन महिन्यांपासून शुकशुकाट असणाऱ्या बाजारपेठेतील रस्त्यांवर आज अमरावतीकरांची गजबज होती. शहरातील राजकमल चौक, जयस्तंभ चौक, राजापेठ, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, रेल्वे स्थानक, कॉटन मार्केट, सरोज चौक, जवाहर गेट, चित्र चौक, इटवरा बाजार, गांधी चौक, गडगेनागर, शेगाव नाका, चोराशी पुरा आणि बडनेरा परिसरात रस्त्यांवर गर्दी उसळली होती. दरम्यान, शहरातील काही भागात रस्त्यांची कामे सुरू असल्याने जयस्तंभ ते जवाहर गेट, सरोज चौक ते चित्रास चौक, शाम चौक ते सरोज चौक अशा गर्दीच्या मार्गांवर जड वाहनास प्रवेश बंदी करण्यात आली होती.

संचारबंदी नियमात असे झाले बदल -

जवळपास तीन महिन्यांपासून संचारबंदी असणाऱ्या अमरावती शहारात जीवनावश्यक सेवेसह सर्व प्रकारची दुकाने सकळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. उपहारगृहे, हॉटेलमधून घरपोच सेवा सकळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार असून मद्यगृहे व बारला सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत घरपोच सेवेची परवानगी देण्यात आली आहे. दुपारी 3 नंतर वैद्यकीय किंवा अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास मनाई आहे. नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून दुकानात सोशल डिस्टन्स न पाळल्याचे आढल्यास 35 हजराचा दंड दुकान मालकास ठोठावला जाणार आहे.

हेही वाचा - अमरावती : काम पूर्ण झाल्यावर मांडला प्रस्ताव; शिराळा ग्रामपंचायतीचा अजब कारभार

Last Updated : Jun 1, 2021, 4:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.