ETV Bharat / state

अमरावतीत शेतकऱ्यांची जमीन हडपणाऱ्या २१ सावकारांवर गुन्हे दाखल - farmer prob;le

महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १६ आणि १७ अंतर्गत या २१ अवैध सावकारांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. या कारवाईमुळे अवैध सावकारांच्या ताब्यात असणारी शेतकऱ्यांची १४.४५ हेक्टर शेतजमीन पुन्हा एकदा मूळ मालकांकडे आली आहे.

अमरावतीत शेतकऱ्यांची जमीन हडपणाऱ्या २१ सावकारांवर गुन्हे दाखल
author img

By

Published : May 1, 2019, 9:16 PM IST

अमरावती - गत दोन-तीन वर्षांपासून झालेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच कर्जाची परतफेड न केल्याने अवैध सावकारांनी अनेकांच्या जमिनी हडप केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. याची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कठोर पावले उचलून २१ अवैध सावकारांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १६ आणि १७ अंतर्गत मार्च २०१८ अखेरपर्यंत जिल्ह्यात १८२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच यावर्षी मार्च अखेरपर्यंत ७२ तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यलयाला प्राप्त झाल्या होत्या. गत काही वर्षांपासून निसर्गाने साथ दिली नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीसाठी अनेकांनी जवळचे दागिने तर काहींनी चक्क शेतीच गहाण ठेवली. पावसाने दगा दिल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले. सावकाराकडून पैशांचा तगादा लावला जात असल्याने २०१६ ते २०१८ दरम्यान ८९५ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या.

अमरावतीत शेतकऱ्यांची जमीन हडपणाऱ्या २१ सावकारांवर गुन्हे दाखल

अवैध सावकारांच्या जाचाला कंटाळून आजवर एकूण २५४ शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारी दिल्या.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दाखल घेत ५७१ परवाना धारक सावकारांची चौकशी करून त्यापैकी १८ जणांचे परवाने रद्द केले. तसेच शेतकऱ्यांची शेती हडपणाऱ्या २१ अवैध सावकारांविरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आमच्याकडे प्राप्त तक्रारीनंतर अवैध सावकारांनी हडपलेली १४.४५ हेक्टर शेती मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना परत मिळाली आहे. जिल्ह्यात जिथे कुठे अवैध सावकारी सुरू असेल त्याची तक्रार नागरिकांनी आमच्याकडे करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले आहे.

Intro:गत दोन तीन वर्षांपासून झालेल्या अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्यावर कर्जाची परतफेड करणे अशक्य झाल्याने कर्ज देणाऱ्या अवैध शेतकऱ्यांनी अनेकांच्या जमिनी हडप केल्याचे अनेक प्रकरणं समोर आल्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कठोर पाऊल उचलून २१ अवैध सवकारांनविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १६ आणि १७ अंतर्गत या २१ अवैध सवकरांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. या कारवाईमुळे अवैध सावकारांच्या ताब्यात असणारी शेतकऱ्यांची १४.४५ हेक्टर शेत जमीन पुन्हा एकदा मूळ मालकांकडे आली आहे.

Body:महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १६ आणि १७ अंतर्गत मार्च २०१८ अखेर पर्यंत अमरावती जिल्ह्यात १८२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच या वर्षी मार्च अखेर पर्यंत ७२ तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यलयाला प्राप्त झाल्या होत्या. गत काही वर्षांपासून निसर्गाने साथ दिली नसल्याने जिल्हयातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीसाठी अनेकांनी जवळचे दागिने तर काहींनी चक्क शेतीच गहाण ठेवली . पावसाने दगा दिल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले.सावकाराकडून पैशांचा तगादा लावला जात असल्याने २०१६ ते २०१८ दरम्यान ८९५ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या.
अवैध सावकारांच्या जाचाला कंटाळून आजवर एकूण २५४ शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारी दिल्या.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दाखल घेत ५७१ परवाना धारक स्वकरांची चौकशी करून त्यापैकी १८ जणांचे परवाने रद्द केले. तसेच शेतकऱ्यांची शेती हडपणाऱ्या २१ अवैध सावकारांविरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आंचयकडे प्राप्त तक्रारीनंतर अवैध सावकारांनी हडपलेली १४.४५ हेक्टर शेती समाधीत शेतकऱ्यांना परत मिळाली आहे. जिल्ह्यात जिथे कुठे अवैध सावकारी सुरू असेल त्याची तक्रार नागरिकांनी आंचयकडे करावी असे आव्हान जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी 'ईटीव्ही भारत' बोलताना केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.