ETV Bharat / state

Agricultural Exhibition Amravati: शेणाच्या गोवऱ्या मॉलनंतर थेट कृषी प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी उपलब्ध, शहरातील नागरिकांचे वेधले लक्ष

शहरातील सायन्स कोर मैदान येथे राज्य शासनाच्या वतीने, कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. वाठोडा शुक्लेश्वर येथील नवदुर्गा महिला बचत गटाच्या वतीने लावण्यात आलेल्या शेणाच्या गोवऱ्यांचा स्टॉल प्रदर्शनात येणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधत आहे. गाईच्या गोठ्यातील शेणाच्या गोवऱ्या मॉलनंतर थेट कृषी प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याने गोवऱ्यांबाबत कुतूहल वाढले आहे.

Agricultural Exhibition Amravati
शेणाच्या गोवऱ्या प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी
author img

By

Published : Mar 4, 2023, 10:08 AM IST

शेणाच्या गोवऱ्या प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी दाखल

अमरावती: गाईचे शेण आणि या शेणापासून तयार केल्या जाणाऱ्या गोवऱ्या या, आजच्या पिढीतील शहरी भागात राहणाऱ्या लहान मुलांसाठी विचित्रपणा वाटत असले तरी, वास्तवात परंपरेनुसार गाईच्या शेणाला आणि या शेणाच्या गोवऱ्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीत प्रचंड महत्त्व आहे. ग्रामीण भागात आज घरोघरी गॅस सिलेंडर पोहोचले आहे. तरी अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी गोवऱ्यांचा वापर केला जातो. आज पासून दहा पंधरा वर्षांपूर्वी गोवऱ्या या अर्थार्जनासाठी उपयुक्त ठरू शकतात अशी कल्पना देखील अशक्य होती. आज मात्र चक्क गोवऱ्यांचा बिजनेस वाठोडा शुक्लेश्वर येथील मनीषा बनसोड यांनी सुरू केला आहे. त्याचा गोवऱ्या विकण्याचा बिजनेस असल्याचे त्या मोठ्या अभिमानाने सांगतात. घरी असणाऱ्या गाई म्हशीच्या शेणाद्वारे मनीषा बनसोड आणि त्यांच्या सासू शेणाच्या गोवऱ्या थापतात. आता गावात पूर्वीप्रमाणे गोवऱ्या भेटत नसल्यामुळे, अनेकांना रोडगे करण्यासाठी गवऱ्यांची गरज लागते. होळी सीझनमध्ये गोवऱ्यांना प्रचंड मागणी असते. या गोवऱ्या विकून चांगले पैसे मिळतात असे मनीषा बनसोड सांगतात.

गोवऱ्या शेणखत तयार करण्याची ऑर्डर: आज अनेक शेतकरी आपल्या शेतात उत्कृष्ट पीक यावे यासाठी शेणखताचा वापर करत आहे. आमच्या वाठोडा शुक्लेश्वर या गावासह लगतच्या परिसरातील अनेक शेतकरी आमच्याकडे शेणखताची ऑर्डर देतात. ऑर्डर प्रमाणे आम्ही शेणखत तयार करतो. यासोबतच गोवऱ्यांची ऑर्डर देखील येते. गत दोन अडीच वर्षांपासून गोवऱ्या आणि शेणखताचा बिझनेस सुरू केला. या माध्यमातून आम्हाला चांगले पैसे मिळतात असे देखील मनीषा बनसोड यांनी सांगितले.

होळीसाठी गोवऱ्यांची मागणी: आता होळी असल्यामुळे शेणाच्या गोवऱ्या आणि खेळापासून बनवलेल्या विविध आकाराच्या चाकोल्यांची मागणी आमच्याकडे वाढली आहे. होळीमध्ये गोवऱ्यांसोबतच शेणाच्या विविध आकारातील चाकोल्यांनी तयार केलेला हार वाहिला जातो. त्यामुळे अशा चाकोल्या आणि चाकोल्यांचा हार देखील आम्ही या कृषी प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला असल्याचे मनीषा बनसोडे यांनी सांगितले.

होळीचा सण १५ दिवस : तुम्हा सर्वांना माहित असेलच की ब्रजची होळी संपूर्ण देशात आकर्षणाचे केंद्र आहे. बरसाणेची लाठमार होळी तितकीच प्रसिद्ध आहे, जिथे स्त्रिया पुरुषांच्या रंगांना काठ्या आणि कापडाने बनवलेल्या फटक्याने प्रतिसाद देतात. संपूर्ण ब्रज परिसरात ही परंपरा अनेक दिवस चालते. मथुरा वृंदावनासह, ब्रज प्रदेशातील इतर जिल्ह्यांमध्ये होळीचा सण १५ दिवस आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

हेही वाचा: Amravati News मेळघाटात कृषी प्रदर्शनात बांबूंच्या आभूषणाने वेधले सर्वांचे लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.