ETV Bharat / state

Couple Suicide : धावत्या मालगाडीसमोर उडी घेत तरुण आणि तरुणीची आत्महत्या - जोडप्याने आत्महत्या केली

अकोल्याहून बडनेराकडे येणाऱ्या मालगाडी दरम्यान दुर्गापूर गावाजवळ एका तरुण आणि तरुणीने रेल्वेसमोर आत्महत्या केली. घटनास्थळी मुलीची पर्स पडलेली आढळून आली. त्या पर्समध्ये सापडलेल्या आधारकार्ड आणि काही कागदपत्रांच्या आधारे मुलीची ओळख पटली आहे.

युगुलाची आत्महत्या
युगुलाची आत्महत्या
author img

By

Published : Jun 21, 2023, 3:25 PM IST

अमरावती : अकोल्याहून बडनेराकडे जाणाऱ्या मालगाडीसमोर उडी घेत तरुण आणि तरुणीने आत्महत्या केल्याची घटना काल रात्री उशिरा घडली. मृत मुलीची ओळख पटली असली तरी मुलाची ओळख पटलेली नाही. बडनेरा रेल्वे स्थानकाच्या पुढे दुर्गापूर गावाजवळ ही घटना उघडकीस आली आहे.

आकस्मिक मृत्यूची नोंद : मिळालेल्या माहितीनुसार, राधा देविदास पवार (वय 20, रा. कोकर्डा तहसील अंजनगाव सूर्जी ) असे मृत तरुणीचे नाव आहे. अकोल्याहून बडनेराकडे येणाऱ्या मालगाडी दरम्यान दुर्गापूर गावाजवळ एका तरुण आणि तरुणीने रेल्वेसमोर आत्महत्या केली. या घटनेची माहिती रेल्वे चालकाने रेल्वे पोलिसांना दिली होती. माहिती मिळताच बडनेरा पोलीस आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मुलीची पर्स पडलेली आढळून आली. त्या पर्समध्ये सापडलेल्या आधारकार्ड आणि काही कागदपत्रांच्या आधारे मुलीची ओळख पटली आहे. बडनेरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत युवतीच्या आधारकार्डवरून पोलिसांनी तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली.

घरातून बेपत्ता होती मुलगी : युवतीचा चुलतभाऊ बडनेरा ठाण्यात पोहोचला आणि त्याने युवतीला ओळखले आहे. रात्री ती घरी होती, परंतु सकाळी कुठे गेली, याबाबत माहिती नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मुलगी कोकडी (ता. अंजनगावसुर्जी) येथील असल्याने मृत युवकसुद्धा त्याचा परिसरातील असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी दिली. दोघांनाही गंभीर मार लागलेला होता. तर मुलीच्या डोक्याला गंभीर मार लागलेला होता. मुलीची पर्स घटनास्थळापासून काही अंतरावर आढळली. त्यात मुलीचे आधारकार्ड तसेच महत्त्वाची कागदपत्रे त्या मुलीची ओळख पटली.

हेही वाचा -

  1. Nanded Crime : नांदेडमध्ये सशस्त्र जमावाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, 6 जण जखमी; गोरक्षक असल्याचा ग्रामस्थांचा दावा
  2. Solapur Crime News: आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून तीन युवकांना बेदम मारहाण; व्हिडीओ चित्रीकरण करून केला सोशल मीडियावर अपलोड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.