ETV Bharat / state

बाजारात भाव नसल्यानं शेतकऱ्यांनी घरातच साठवला कापूस; जिनिंग उद्योग डबघाईला, तीन लाख कामागारांवर उपासमारीची वेळ

Problem of Cotton : बाजारात कापसाला योग्य भाव नसल्यानं शेतकऱ्यांनी कापूस आपल्या घरातच साठवून ठेवलाय. यामुळं बाजारात कापसाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यानं जिनिंग उद्योग संकटात सापडलाय.

शेतकऱ्यांनी घरातच साठवला कापूस
शेतकऱ्यांनी घरातच साठवला कापूस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 10:00 AM IST

जिनिंग उद्योग डबघाईला

अमरावती Problem of Cotton : कापूस उत्पादनात राज्यात आघाडीवर असणाऱ्या अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात कापसाला चांगला भाव मिळतं नसल्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस आपल्या घरातच साठवून ठेवलाय. कापसाला सरकार योग्य भाव देईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र, बाजारात कापसाचा प्रचंड तुटवडा असल्यामुळं जिनिंग उद्योग संकटात सापडलंय.

शेतकऱ्यांना भाव वाढीची प्रतीक्षा : कापसाला गतवर्षी सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव होता. त्यामुळं गतवर्षीपेक्षा अधिक भाव मिळेल, या अपेक्षेनं अनेक शेतकऱ्यांनी आपल्या घरातला कापूस बाजारात आणलाच नाही. यावर्षी अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन झालंय. गेल्या वर्षीचा कापूस घरी असताना यावर्षीही शेतकऱ्यांनी कापसाचा साठा घरातच करुन ठेवलाय. दसऱ्याला शेतकरी कापूस बाजारात आणतो. मात्र दसऱ्याला हवा तसा भाव नव्हता. दिवाळीतही तीच परिस्थिती होती. दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव कापसाला मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, कापसाला सध्या केवळ 7000 पर्यंतच भाव असल्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या कापूस विक्रीला नकार दिला आहे.

कापसाला योग्य भाव मिळेल अशी प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. कापसासाठी वापरण्यात आलेले बियाणे व इतर गोष्टींचा विचार केल्यास बाजारात सध्याच्या भावानं आम्ही कापूस विकला तर आमच्या हाती एक रुपयादेखील मिळणार नाही-कापूस उत्पादक अतुल जुमळे

जिनिंग उद्योग डबघााईस : शेतकऱ्यांनी बाजारात कापूस आणणं बंद केल्यामुळं अमरावती विभागासह संपूर्ण राज्यातील जिनिंग उद्योग डबघाईस आलाय. त्यामुळं जिनिंग बंद असली तरी जिनिंगसाठी लागणारी वीज, सुरक्षा खर्च तसंच इतर मेन्टेनन्ससाठी लागणारा खर्च यामुळं जिनिंग उद्योग प्रचंड अडचणीत सापडल्याचं शेतकरी उद्योग समूहाचे व्यवस्थापक रुपेश बकाल यांनी सांगितलं. पूर्वी विदर्भ, मराठवाडा आणि खांदेश या परिसरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कापसाच्या लागवडीमुळं या भागात जिनिंग उद्योग मोठ्या प्रमाणात चालत होता. आजही या भागात जिनिंग उद्योगाचे वैभव पाहायला मिळते. मात्र, गत दोन वर्षांपासून बाजारात कापूस येणं बंद झाल्यामुळं जिनिंग उद्योग ठप्प झाला आहे. या उद्योगाशी संबंधित तीन लाख कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याची माहिती रुपेश बकाल यांनी दिलीय.

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना त्रास : दोन वर्षांपासून आम्ही कापूस विकला नाही. आता मात्र आमच्यासारख्या सर्वच शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. व्यापारी गावात कापूस खरेदीसाठी येतात. मात्र, ते कापसाचा अतिशय कमी दर सांगतात. व्यापारी शेतकऱ्यांचा कापूस घेऊन जातात. मात्र, पैसे अडवून ठेवतात. अशा अनुभवांमुळं शेतकरी व्यापाऱ्यांना कमी दरात कापूस द्यायला तयारच नाहीत, असं बुलढाणा जिल्ह्यातील राजूर येथील शेतकरी राजेंद्र उदयकार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले. तसंच सध्या शेतकऱ्यांवर बँकेचं सात ते आठ लाख रुपयांपर्यंत कर्ज थकीत आहे. अशा अवस्थेत कमी दरानं कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडणारं नसल्याचंही राजेंद्र उदयकार म्हणाले.

शेतकऱ्यांनी वास्तविकता समजून घेण्याची गरज : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातून कापसाची मागणी कमी झालीय. यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर घसरले आहेत. आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याबाबत माहिती नाही. यामुळं त्यांना सरकार किंवा व्यापारी आपल्या मनाला भाव देत नाही, असं वाटत आहे. वास्तविक परिस्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांनीदेखील समजून घ्यायला हवी असं बुलढाणा येथील कापूस व्यापारी गोपाल गोयंकर ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले.

हेही वाचा :

  1. आंतरराष्ट्रीय 'हॉर्टीप्रोइंडिया हॉर्टीकल्चर'चे प्रदर्शन पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी; देश-विदेशातील नागरिक सहभागी
  2. A Boon For Farmers : शेतकऱ्यांनो आता पावसाची चिंता सोडा; जळगावातील शेतकरी पुत्रानं केलं अनोख संशोधन
  3. Tomato Farmer Crorepati : लाल टोमॅटोमुळे शेतकरी झाला मालामाल! टोमॅटो विकून कमावले करोडो रुपये!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.