ETV Bharat / state

शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांना कोरोना, जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 828 वर - शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांना कोरोना

शिक्षक आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांना कोरोना झाल्याचा अहवाल नागपूर येथील खासगी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला. यानंतर लगेच आमदार प्रा. देशपांडे हे कोरोनावर उपचार करण्यासाठी नागपूरला रावना झालेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे.

number of coroners in the district at 828
अमरावती जिल्ह्यात कोरोंग्रस्तांची संख्या 828 वर
author img

By

Published : Jul 11, 2020, 7:36 PM IST

अमरावती - अमरावती विभाग शिक्षक मतरदार संघाचे आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट होताच खळबळ उडाली आहे. कोरोना अहवाव प्राप्त होताच श्रीकांत देशपांडे हे उपचारासाठी नागपूरला रवाना झालेत. अमरावतीत शनिवारी दिवसभरात 33 कोरोना रुग्ण आढळुन आले असून जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 828 वर पोचली आहे.

येथील फारशी स्टॉप परिसरात सुभाष कॉलनी येथील रहिवासी असणारे शिक्षक आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांना कोरोना झाल्याचा अहवाल नागपूर येथील खासगी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला. यानंतर लगेच आमदार प्रा. देशपांडे हे कोरोनवर उपचार करण्यासाठी नागपूरला रावना झालेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे.

आमदार प्रा. श्रीकांत देशोपांडे हे दोन दिवसांपूर्वी मुंबईवरून अमरावतीत परतले होते. प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने डॉक्टरांनी त्यांचा स्वब घेऊन तपासणीसाठी नागपूर येथील खासगी प्रयोगशाळेत पाठविला होता. शनिवारी सकाळी त्यांना कोरोना असल्याचा अहवाल प्राप्त झाला. अमरावतीत शनिवारी एकूण 33 कोरोना रुग्ण आढळले आहेत. मांगीलाल प्लॉट येथे दोघांना कोरोना झाला असून शेगाव नाका परिसरात 3, बडनेरा येथे 6, कॅम्प परिसरात 4, कांता नगर येथे 3, अशोक नगर येथे 3, सातरगाव येथे 1, राजापेठ येथी बजरंग टेकडी परिसरात 1, कृष्ण नगर परिसरात 1, सिद्धेश्वर सोसायटी येथे 1 तसेच परतवाडा शहरातील सायमा कॉलनी येथे 4 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. अमरावतीत झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी घोषित केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.