ETV Bharat / state

Contaminated Water : दूषित पाण्याचा आणखी एक बळी; कोयलारीत रुग्णांच्या संख्येत वाढ

दुषित पाण्यामुळे ( contaminated water ) कोयलारी गावात एक जण दगावल्याची घटना घडली ( One dies due to contaminated water ) आहे. अमरावती जिल्ह्यातील पाचडोंगरी ( Pachdongri ) तसेच कोयलारी गावात अतिसार ( Diarrhea Disease) आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत 221 रुग्णांवर प्रशासनाने उपचार केले आहेत. तसेच गावातील विहरीचे पाणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

contaminated water
दूषित पाण्याचा आणखी एक बळी
author img

By

Published : Jul 9, 2022, 10:19 PM IST

अमरावती - पाचडोंगरी तसेच कोयलारी या दोन गावात अतिसार ( Diarrhea Disease) या आजाराने थैमान घातले आहे. आज सकाळी 75 वर्षीय मुनिया रंगीसा उईके ( वय 75 ) राहणार कोयलारी ( Pachdongri ) ही महिला अतिसार आजाराची चौथी बळी ( For dies due to contaminated water )ठरली आहे. सकाळी नऊ वाजता या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरीकडे या आजाराने पाच डोंगरी, कोयलारी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर, ही वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

टँकरने पाणी पुरवठा - प्रशासनाने सध्या पाचडोंगरी, ( Pachdongri ) कोयलारी या दोन्ही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. टँकरचे पाणीसुद्धा नागरिकांना क्लोरीफाइड करून देण्यात येत आहे. तसेच दोन्ही गावात आरोग्य विभागामार्फत कॅम्प लावण्यात आला आहे. घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी केली जात आहे. गावात मोठ्या प्रमाणात औषधसाठा डॉक्टर उपलब्ध आहेत. तसेच अकोल्यावरून डॉक्टरांचे एक पथक या ठिकाणी दाखल झाले आहे.

विहिरीच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी - कोयलारी या गावात सध्या रुग्ण वाढत आहेत दोन्ही गावात कॅम्प लावले आहे मेडिसिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे 221 रुग्णांवर कालपर्यंत उपचार केले आहेत. तसेच गावातील विहिरीचे पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच रुग्णांचे शौचालयाचे नमुने सुद्धा लॅब मध्ये पाठवले आहेत. गावात कॅम्पवर तसेच काट कुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र चुरणी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी 100 च्या वर रुग्ण उपचार घेत आहेत तर काही रुग्ण या ठिकाणी भरती सुद्धा आहेत.

दरम्यान, मेळघाटात चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या चुरणी काटकोन पाठ डोंगरी या गावांमध्ये ग्रामस्थांनी विहिरीचे दूषित पाणी ( contaminated water ) पिल्यामुळे विषबाधा होऊन एकूण दोन जण दगावले होते. या संपूर्ण प्रकाराबाबत जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी रोष व्यक्त केला होता. चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आदिवासी बांधवांनी वीज देयक भरले नसल्यामुळे त्यांच्या गावातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. गावात वीज पुरवठा नसल्यामुळे शुद्ध पाणी देखील ग्रामस्थांना मिळणे बंद झाले होते. तहान भागवण्यासाठी ग्रामस्थांना विहिरीच्या अशुद्ध पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. अशुद्ध पाणी पिल्यामुळे या तीनही गावात अनेक जण आजारी पडले आहे. तर, दोन जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. यावर अमरावतीच्या खासदार नवनित राणा यांनी दु:ख व्यक्त केले असून ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

20 जण गंभीर - दूषित पाणी पिल्यामुळे या तिन्ही गावातील एकूण 50 जणांना विषबाधा झाली असून यापैकी 20 जण अति गंभीर आहे. या 20 ही जणांवर चूर्ण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अमरावती वरून वैद्यकीय पथक या ठिकाणी पाठवण्यात आले असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. 30 जणांवर काट कुंभ आणि पचडोंगरी या गावात उपचार सुरू आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी निर्देश दिले आहेत.

हेही वाचा - Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राणांचा कार्यकर्ता; फेसबूकवर नवनीत राणांच्या अनेक पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.