अमरावती - पंडित जवाहरलाल नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असेपर्यंतच्या 70 वर्षाच्या काळात भारताचा विकास झाला असतांना मोदींच्या सात वर्षाच्या कालखंडात देश बरबाद झाला आहे, अशी टीका राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (दि. 30 मे) अमरावती आयोजित पत्रकर परिषदेत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाले असताना या सात वर्षांत देशाचे जे नुकसान झाले त्याबाबत विजय वडेट्टीवार यांनी खंत व्यक्त केली.
सरदार वल्लभभाई पटेलांच्या नावाचे विमानतळ झाले अदानींचे
70 वर्षांत देशाचा जो विकास झाला, जी नवरत्ने देशात विकसित झाली त्यांची विक्री करण्याचा उद्योग मोदी सरकारने केला आहे. ज्या विमानतळाला सरदार वल्लभभाई पटेल नावाने ओळख हाती ते विमानतळ आता अदाणीला विण्यात आले असून त्या विमानतळाचे नाव आता अदाणी विमानतळ झाल्याची खंत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
देशावर आलेल्या संकटाची मोदी सरकारला चिंता नाही
देशावर संकट येतांना मोदी सरकारला याची कुठलीही चिंता नाही. कोरोना देशात येताच तज्ज्ञांनी देशात लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला होता. मात्र, नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या स्वागताच्या तयारीत गुंतले होते. परिणामी देशात कोरोनाची पहिली लाट आली. दुसऱ्या लाटेच्या वेळी नरेंद्र मोदी हे चार, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत व्यस्त झाले. त्यांच्या अशा धोरणांमुळे देशांत कोरोनाची दुसरी लाट ही जीवघेण्या स्वरूपात आली असून त्यांच्या मनमर्जी कारभारामुळे देशात अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. आज भारताचे दरडोही उत्पन्न हे बांग्लादेशच्या दरडोही उत्पन्नापेक्षाही खाली आले आहे, असेही मंत्री वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा - ओबीसीच्या वाट्याचे आरक्षण नाकारणाऱ्या संभाजीराजेंच्या भूमिकेचे स्वागत - वडेट्टीवर