ETV Bharat / state

विदर्भाचा पारा आणखी घसरणार; 29 तारखेपासून थंडीच्या लाटेचा अंदाज

विदर्भात मंगळवारपासून पुन्हा एकदा थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हिमालयात हिमवृष्टीला सुरवात झाल्याने उत्तरेतील शीत वारे दक्षिणेकडे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीची लाट काही दिवस कायम राहिल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

amravati
विदर्भाचा पारा आणखी घसरणार
author img

By

Published : Dec 28, 2020, 9:54 AM IST

Updated : Dec 28, 2020, 2:48 PM IST

अमरावती - मागील काही दिवसांपासून विदर्भात कडाक्याची थंडी असतानाचा आता पाकिस्तानमधील चक्री वाऱ्यामुळे, हिमालयातील थंड वारे विदर्भात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 29 तारखेपासून विदर्भात पुन्हा थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

विदर्भाचा पारा आणखी घसरणार
हिमालयात बर्फवृष्टी होणार-

गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात चक्राकार वारे निर्माण झाले आहे. परिणमी वाऱ्याची दिशा विस्कळीत होऊन तापमानात चढ उतार होत होते. त्याचा परिणाम विदर्भातील तापमानावर झाल्याने पारा आठ अंशावर येत होता. त्यानंतर आता हिमालयाच्या पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे त्या ठिकाणी बर्फवृष्टी होणार असल्याची शक्यता आहे. परिणामी उत्तरकेडून थंड वारे दक्षिणेकडे वाहण्याची शक्यता आहे.

थंडीची लाट काही दिवस कायम राहण्याची शक्यता-

उत्तरे कडून दक्षिणकडे वाहणारे वारे सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा विदर्भात तापमान कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तान मध्ये चक्री वाऱ्यामुळे हिमालयातील थंड वारे विदर्भात प्रवेश करतील. त्यामुळे येत्या २९ तारखेपासून विदर्भातील सौम्य थंडीची लाट येणार आहे. तसेच ही लाट काही दिवस कायम राहण्याचा अंदाज असल्याची माहिती अमरावती विभाग हवामान तज्ञ अनिल बंड यांनी दिली.

Last Updated : Dec 28, 2020, 2:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.