अमरावती: डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंतीनित्त गावात निघालेली मिरवणूक जामा मशीदजवळ शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता पोहोचली होती. त्यावेळी डीजेच्या आवाजावरून दोन गटात काहीसा वाद झाला. दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करून वाद सोडविला. यानंतर मिरवणूक सुरळीतपणे पुढे निघाली; परंतु मिरवणूक परत याच मार्गाने रात्री साडेनऊ ते दहाचे दरम्यान आली तेव्हा मिरवणुकीतील काही युवकांनी जोरजोर्याने घोषणाबाजी गेली. यामुळे या ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला आणि मशिदीजवळ दोन समूहांमध्ये हाणामारी झाली.
अनेक जण जखमी: दोन्ही समुदायातील लोकं एकमेकांवर तुटून पडल्याने मशीदशेजारी असणाऱ्या मोठ्या सिमेंट नालीमध्ये पडून काही लोक जखमी झालेत. पोलीस कर्मचार्यांनाही वाद सोडवितेवेळी किरकोळ मार लागला. यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुरू केला. यामुळे दोन्ही समूहामधील लोक पळून गेलेत. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यानंतर पोलिसांनी डीजेचा ट्रॅक्टर जप्त केला आणि मिरवणुकीचा ट्रॅक्टर पुढे रवाना केला.
35 जणांवर गुन्हे दाखल: या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही समाजातील लोकांची मध्यस्थी करून समजूत घातली. घटना प्रकरणी दोन्ही समाजामधील एकूण 35 लोकांवर आपसात वाद घालून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक आणि पोलीस कर्मचारी तैनात आहेत. यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव राजस यांनी घटनेची फिर्याद केली. रात्री साडेअकरा वाजता घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी भेट दिली आणि स्थिती जाणून घेतली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असून गावात शांतता आहे. पोलीस प्रशासन घटनेला कारणीभूत असलेल्या लोकांचा शोध घेत आहे, अशी माहिती ठाणेदार पंकज दाभाडे यांनी दिली.
विजेच्या झटक्याने २ जणांचा जागीच मृत्यू: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का लागल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले. ही घटना विरारच्या कारगिल नगर येथे गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मिरवणुकीत दुर्घटना: गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विरारच्या कारगिल नगर येथील बौध्दजन पंचायत समितीतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री नऊ वाजता निघालेली ही मिरवणूक साडेदहा वाजता संपली. घटनेची खबर मिळताच स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, भीम सैनीक, डॉ .बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी नालासोपाऱ्याच्या तुळींज रुग्णालयात गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे ,नायब तहसीलदार सीके पवार यांनी घटना स्थळाला भेट दिली.