अमरावती - वाढत्या कोरोनाग्रस्तांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, अमरावतीत रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसत आहे. शहरातील विविध भागात भाजी मंडईही सुरू होती.
अमरावतीत बुधवारी आढळले 649 कोरोना रुग्ण
जानेवारी-फेब्रुबरी महिन्यात दिवसाला एक हजारांवर कोरोना रुग्ण आढळत होते. बुधवारी जिल्ह्यात 649 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. बुधवारी 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 739 रुग्ण दगावले आहे. दगवलेल्या कोरोना रुग्णांपैकी 538 पुरुष तर 189 महिलांचा समावेश आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार 50 ते 70 वयोगटातील रुग्ण मोठ्या संख्येत दगवले आहेत.
गर्दीवर नियंत्रण नाहीच
संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे शासनाने स्पष्ट केले असताना अमरावतीत याचा कुठलाही परीणाम गर्दीवर झालेला दिसत नाही. सकळी 11 पर्यंत मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त दिसला नाही. 11 नंतर पोलीस बंदोबस्त असला तरी रस्त्यावरून जाणाऱ्या कोणालाही पोलीस फिरण्याचे कारण विचारत नव्हते.
जिल्ह्यात 3 हजार 740 सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात सध्या एकूण 3 हजार 740 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी 1 हजार 355 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हेही वाचा - सेवानिवृत्त पोलीस अधिकारी करतोय कोरोना नियमांची जनजागृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लिहिले होते पत्र
हेही वाचा - अमरावतीच्या अंतोरा परिसरात गारपीट; रब्बी हंगामातील कांदा, गहू तसेच टरबूज पिकाला फटका