ETV Bharat / state

केंद्रीय ग्राम विकास पथक अमरावती जिल्ह्यात दाखल; अनेक गावांना दिल्या भेटी - केंद्रीय ग्रामविकास पथक दौरा अमरावती

केंद्र सरकारकडून ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो. केंद्र सरकारने दिलेल्या निधीचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अंतर्गत कशाप्रकारे उपयोग केला, याचा आढावा घेणारे खासदारांचे पथक आज अमरावती जिल्ह्यामध्ये दाखल झाले.

Central Village Development Squad visit amravati
केंद्रीय ग्रामविकास पथक दौरा अमरावती
author img

By

Published : Aug 17, 2021, 4:04 PM IST

Updated : Aug 17, 2021, 5:56 PM IST

अमरावती - केंद्र सरकारकडून ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो. केंद्र सरकारने दिलेल्या निधीचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अंतर्गत कशाप्रकारे उपयोग केला जातो, त्या निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागात कशा पद्धतीने कामे झालेली आहेत, या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आणि लेखाजोखा घेण्यासाठी ३१ खासदारांचे केंद्रीय ग्रामविकास पथक हे आज अमरावती जिल्ह्यामध्ये दाखल झाले.

माहिती देताना खासदार आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - तुम्ही जन आशीर्वादाचे नाही तर पापाचे भागीदार; भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर आमदार देवेंद्र भुयारांची टीका

पथकामध्ये केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा देखील समावेश आहे. केंद्रीय पथकाने आज अमरावती जिल्ह्यातल्या अनेक गावांना भेटी दिल्या असून या गावांतील विकास कामांची पाहणी केली.

केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल, उज्वला गॅस योजना अशा अनेक योजना या ग्रामीण भागांमध्ये राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागांतील लोकांना फायदा झाला आहे का? या संपूर्ण परिस्थितीचा आढावा या पथकाच्या वतीने घेण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा, शेदोळा खुर्द, वलगाव आदी ग्रामपंचायतीला या पथकाने भेटी दिल्या असून ग्रामस्थांशी संवाद साधला आहे. 31 खासदारांचे हे पथक पाहणी झाल्यानंतर याचा अहवाल केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाला सुपूर्द करणार आहे.

हेही वाचा - ग्रामसभा ऑनलाइन पध्दतीने घ्या, ग्रामविकास मंत्र्यांच्या निर्णयावर ग्रामीण भागात नाराजी

Last Updated : Aug 17, 2021, 5:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.