ETV Bharat / state

Bus Fare Hike : ऐन दिवाळीत प्रवाशांचं निघालं दिवाळं; खासगी बसची तिप्पट भाडे वाढ

Bus Fare Hike : ऐन दिवाळीत खासगी बस कंपन्यांनी तिप्पट भाडे वाढ केल्यानं प्रवाशांना आर्थिक फटका बसला आहे. यामुळं प्रवाशांचं दिवाळं निघालं असून, ट्रॅव्हल्स कंपन्यांची दिवाळी साजरी होणार आहे. खासगी बसच्या तुलनेत एसटी बसचे भाडे कमी आहे. याशिवाय महिलांसाठी पन्नास टक्के सवलत, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची सोय मंहामंडळाच्या गाड्यात मिळणार आहे.

Bus Fare Hike
Bus Fare Hike
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 5:01 PM IST

Updated : Nov 4, 2023, 7:18 PM IST

खासगी बसची तिप्पट भाडे वाढ

अमरावती Bus Fare Hike : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यानंतर आता खासगी बस चालकांनी तिप्पट भाडेवाढ केल्यानं सर्वमान्य नागरिकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. खासगी बससह एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणानं दिवाळीत 10 टक्क्यांनी दरवाढ केली आहे.

ऐन दिवाळीत तिप्पट भाडेवाढ : दिवाळीत प्रवाशांची संख्या वाढत असते. त्यामुळं खासगी कंपना भाडेवाढ करतात. मात्र, पुणे ते अमरावती प्रवासात तिप्पट भाडेवाढ झाल्यानं अमरावतीवासीयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. मात्र, प्रवाशांसाठी एसटी महामंडळानं जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच रेल्वे प्रशासनानंही प्रवाशांच्या सोयीसाठी अमरावती ते पुणे दरम्यान विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत.

बाराशेचं तिकीट गेलं साडेतीन हजारावर : दिवाळीनिमित्त मुंबई, नाशिकसह पुणे, अमरावती या मार्गावरून मोठ्या संख्येनं विद्यार्थी, नागरिक आपापल्या घरी परततात. पुण्यातून अमरावतीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या बहुतांशी खासगी बसेसवर अवलंबून आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या खासगी बस कंपन्यांकडून प्रवाशांची लूट सुरू झाली आहे. सर्वसामान्य पुणे-अमरावती तिकीट 1200 ते 1300 रुपये मिळत होतं. मात्र आता तेच टिकीट पुणे-अमरावती प्रवासासाठी 3000 ते 3500 रुपयांना मिळतंय. त्यामुळं खासगी कंपन्याची मनमानी राज्यातील प्रवाशांची लुट करणारी आहे, असं प्रवाशांचं म्हणणे आहे.

  • खासगी बस वाहतूक करणाऱ्यांना सरकारची फूस आहे, सरकारची मिलीभगत असल्याशिवाय ही मनमानी होऊच शकत नाही. सामान्य माणसाचा खिसा कापू नका. मोकळ्या वातावरणात लोकांना सण साजरे करू द्या.@ETVBharatMA https://t.co/UOtpGdajB3

    — Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) November 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'ईटीव्ही भारत'च्या बातमीची दखल : 'ईटीव्ही भारत'च्या बातमीची दखल घेत ज्येष्ठ काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. खासगी बस वाहतूक करणाऱ्यांना सरकारची फूस आहे, सरकारची मिलीभगत असल्याशिवाय ही मनमानी होऊच शकत नाही. सामान्य माणसाचा खिसा कापू नका. मोकळ्या वातावरणात लोकांना सण साजरे करू द्या, अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली.

पुणे ते अमरावती एसटीच्या विशेष गाड्या : दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 8 ते 11 नोव्हेंबर, असे तीन दिवस एसटी महामंडळातर्फे विशेष दहा गाड्यांचं आयोजन करण्यात आलं आहे, असं परिवहन महामंडळाचे अमरावती विभागीय निरीक्षक नीलेश बेलसरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून पुणे अमरावती गाड्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. तसंच दिवाळीनंतर अमरावतीहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा गाड्या 15 ते 25 नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध असतील. सामान्य प्रवासासाठी 860 रुपये, शिवशाही बसच्या तिकिटासाठी 1280 रुपये आकारण्यात येणार आहेत. आर्थिक लूट टाळण्यासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या बसनं प्रवास करण्याला महत्त्व द्यावं, असं आवाहनही निलेश बेलसरे यांनी केलंय.

36 उत्सव विशेष गाड्या : दिवाळीसाठी पुण्याहून अमरावतीला येणाऱ्या तसंच दिवाळीनंतर अमरावतीहून पुण्याला परतणाऱ्या प्रवाशांसाठी 5 ते 20 नोव्हेंबर दरम्यान 36 उत्सव विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत अमरावती रेल्वे स्थानकावरून दर रविवारी, बुधवारी दुपारी 12:40 वाजता एक विशेष गाडी सुटेल. 6 ते 20 नोव्हेंबर दरम्यान पुण्याहून दर गुरुवारी, सोमवारी एक विशेष मेमो रेल्वेगाडी अमरावतीसाठी सुटणार आहे. तसंच बडनेरा रेल्वे स्थानकातून पुण्यासाठी 6 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी एक ट्रेन सुटणार आहे. अमरावती पुणे विशेष फेस्टिव्हल ट्रेनचा लाभ अमरावती, अकोला, मलकापूर, नांदुरा, शेगाव, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, जळगाव, मनमाड येथील प्रवाशांना होणार आहे.

हेही वाचा -

  1. Mukesh Ambani Threat Case : मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्या आरोपीला तेलंगाणातून अटक; आठ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
  2. CM Eknath Shinde : जरांगेंनी उपोषण थांबवताच मुख्यमंत्र्यांनी टाकला सुस्कारा; दोन दिवसांसाठी दरे गावी दाखल
  3. Sanjay Raut On Eknath Shinde : 'ड्रग्ज प्रकरणाची सूत्रं मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का?' राऊतांचा खोचक सवाल

Last Updated : Nov 4, 2023, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.