अमरावती - दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात रेड्यांची झुंज लावण्याची परंपरा आहे. न्यायालयाने पशु हिंसा कायद्याअंतर्गत जनावरांच्या खेळावर बंदी आणली असली तरी ग्रामीण भागात मात्र आजही शेतकरी रेड्याच्या झुंज स्पर्धेचे आयोजन करत असतात. अमरावती शहरानजीक दिवाणखेडा येथेही दिवाळी निमित्ताने रेड्यांची झुंज ही स्पर्धा भरवण्यात आली होती. रेड्यांची झुंज पाहण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा - हिमाचल प्रदेशात पिकअपचा अपघात; सात स्थलांतरीत मजूर ठार
अमरावतीत आयोजकांवर गुन्हे दाखल -
कधीकाळी ग्रामीण भागात रेड्यांच्या झुंजी सामान्य होत्या. मात्र, न्यायालयाने पशुहिंसा कायद्यांतर्गत यावर बंदी आणली. त्यानंतर झुंजींचे प्रमाण कमी झाले असले तरी, त्यांचे आयोजन पूर्णपणे बंद झालेले नाही. मागीलवर्षी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे परंपरेच्या नावाखाली रेड्यांच्या झुंजींचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी, काही आयोजकांवर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत.
रेड्यांना जखमा -
रेड्यांच्या टकरीमध्ये त्यांच्या शरीरावर मोठ्या जखमा झाल्याच्या घटना समोर आले आहे. तरी अनेक आयोजक जनावरांची कुठलीही पर्वा न करता जनावरांचा जीव धोक्यात टाकून त्यांच्या स्पर्धा भरवत असतात.
हेही वाचा - विठ्ठल मंदिरात मुखदर्शन सुरुवात; चेन्नईतील भक्तांना मिळाला सर्वप्रथम दर्शनाचा मान