अमरावती : नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला सिंदखेड राजा जवळ झालेल्या भीषण अपघातात 26 जण ठार झाले असून हा अपघात भरधाव वेगात असणारी बस समृद्धी महामार्गावर असणाऱ्या लोखंडी पोलवर धडकली आणि ही दुर्दैवी घटना घडल्याचा अहवाल अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.
असा आहे अहवाल : भरधाव वेगात असणारी ही बस समृद्धी महामार्गावरून धावत असताना रस्ता दुभाजकालगत असणाऱ्या स्टीलच्या खांबावर ही बस धडकणे यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसच्या उजव्या बाजूचा चाक डिव्हायडर ला धडकताच बसचा टायर फुटला फुटला आणि ही बस पलटली आणि सिमेंट रोडवर दूरपर्यंत घासत गेली अतिशय वेगात असणाऱ्या ह्या बसच्या. डिझेलची टॅंक फुटली आणि आधीच प्रचंड गरम असणाऱ्या बसच्या इंजन ने पेड घेतला आणि आणि काही क्षणातच संपूर्ण बस जळाली. घेतला आणि काही क्षणातच मोठा भडका होऊन बस पेटली. यावेळी बसचे आपत्कालीन दार आणि खिडकी देखील उघडू शकली नाही.
अतिवेग हे कारण नाही : ही बस रात्री 11 वाजून आठ मिनिटांनी समृद्धी महामार्गावर आली आणि रात्री एक वाजून 32 मिनिटांनी बसचा अपघात झाला. समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पॉईंट पासून ही बस 152 किलोमीटर अंतरापर्यंत दोन तास 24 मिनिटांनी पोचली होती. यावरून बसचा वेग हा 70 किलोमीटर प्रतितास असे स्पष्ट होत असून अतिवेग हे या अपघाताचे कारण नसल्याचे अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी राम गीते यांनी अहवालात स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घटनास्थळी दाखल : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडून 26 प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातात विदर्भ एक्सप्रेस या खासगी बसने अगोदर पोलला धडक दिल्यानंतर पलटी झालेल्या बसने पेट घेतला. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा -