अमरावती- लोकसभा निवडणुकीत आम्हाला मुस्लिम समाजातील मते मिळाली नाहीत. तरीदेखील काही प्रमाणात मुस्लिम समाज आमच्या पाठीशी आहे. मात्र एमआयएमसोबत झालेल्या तुटातुटीचा काही फरक पडणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजातील २५ उमेदवार असतील, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अमरावतीच्या दर्यापुरात आज दुपारी प्रकाश आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली.
अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी वर्षा निमित्ताने मातंग समाज सत्ता संपादन व समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदर्भ लहुजी सेनाचे संस्थापक महादेव खंडारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विजय चोरपगार, प्रा.चरणदास निकोसे, साहेबराव वाघपांजर, नंदेश अंबाळकर, विद्यार्थी सम्यक आंदोलनाचे अंकूश वाघपाजर, जेष्ठ पत्रकार दिलीप एडतकर, वंचित आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख नयन मोंढे उपस्थित होते.