अमरावती- अचलपूर तालुक्यातल्या खैरी - सावळापूर फाट्याजवळ सोमवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास गावठी बॉम्बचा स्फोट झाला. यात एक जण ठार तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. हे दोघे दुचाकीवरून गावठी बॉम्ब घेऊन जात असताना या बॉम्बचा स्फोट झाला.
प्रतिबंध प्रदीप पवार वय 22 (रा. खैरी दोनोडा) असे मृताचे, तर अनिकेत सारंग भोसले 25 असे गंभीर जखमीचे नाव आहे. जखमी तरुणावर असेगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या बॉम्बच्या आवाजाने तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी हे गावठी बॉम्ब लावण्यात येतात. मात्र शिकार न मिळाल्यास पुन्हा हे गावठी बॉम्ब घरी नेले जातात. असाच गावठी बॉम्ब घरी घेऊन जात असताना हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा - अमरावतीत सोनाराच्या घरावर हल्ला; गोळीबार करत चोरट्यांनी लुटले दागिने
हेही वाचा - 'चंद्रकांत पाटलांचे आंदोलन म्हणजे केविलवाणा प्रकार'