ETV Bharat / state

पूर्णा नदीत वाहून गेलेल्या चौघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले; खासदार नवनीत राणा घटनास्थळी - पूर्णा नदी शोधमोहीम

गुरुवारी गणपती विसर्जनादरम्यान वाठोडा शुक्लेश्वर येथे पूर्णा नदीत वाहून गेलेल्या चौघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. गणपती विसर्जना दरम्यान सतीश सोळंके (वय 28), ऋषिकेश वानखेडे (वय 22), संतोष वानखडे (वय 45) आणि सागर शेंदुरकर (वय 20) हे चार जण नदीत बुडाले होते. आज दिवसभर सुरू असणारी शोधमोहीम सायंकाळी थांबवण्यात आली. शनिवारी उर्वरीत दोघांचा शोध घेतला जाणार आहे.

खासदार नवनीत राणा यांनी केली घटनास्थळा्ची पहाणी
author img

By

Published : Sep 13, 2019, 11:33 PM IST

Updated : Sep 13, 2019, 11:44 PM IST

अमरावती - गुरुवारी गणपती विसर्जनादरम्यान वाठोडा शुक्लेश्वर येथे पूर्णा नदीत वाहून गेलेल्या चौघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. आज दिवसभर सुरू असणारी शोधमोहीम सायंकाळी थांबवण्यात आली. शनिवारी उर्वरीत दोघांचा शोध घेतला जाणार आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी आज (शुक्रवारी) दुपारी घटनास्थळाला भेट देऊन शोध मोहिमेबाबत माहिती घेतली.

खासदार नवनीत राणा यांनी केली घटनास्थळा्ची पहाणी

गणपती विसर्जना दरम्यान सतीश सोळंके (वय 28), ऋषिकेश वानखेडे (वय 22), संतोष वानखडे (वय 45) आणि सागर शेंदुरकर (वय 20) हे चारजण नदीत बुडाले होते. या घटनेमुळे वाठोडा शुक्लेश्वरसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. रात्रभर नदीत बुडालेल्यांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर, आज सकाळी बचाव पथकाने पुन्हा एकदा शोध मोहीम राबविली असता बारा वाजेच्या सुमारास संतोष वानखेडे यांचा मृतदेह हाती लागला होता. तर, चार वाजेच्या सुमारास सागर शेंदुरकर याचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला. लगतच्या विश्रोळी धरणाचे दार उघडल्याने पूर्णा नदीला पूर आला होता. या पुरामुळे बचाव पथकाला उर्वरित दोघांचा शोध घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. नदीवरील पुलाखाली मोठ्या प्रमाणात वाहून आलेले लाकडे कचरा अडकल्याने तो काढण्यासाठी जेसीबीही बोलविण्यात आले होते. दरम्यान, बचाव पथकाने मोठ्या अडचणीतही शोध मोहीम सुरूच ठेवली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सतीश सोळंके आणि ऋषिकेश वानखेडे यांचा शोध घेण्यात आला. अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली

हेही वाचा - अमरावतीत गणेश विसर्जनावेळी 4 तरुण नदीत बुडाले; शोध सुरू

दुपारी एक वाजेच्या सुमारास खासदार नवनीत राणा यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध मोहिमेचा आढावा घेतला. तसेच, घटनास्थळी जमलेल्या गौरखेडा वासियांची संवाद साधला. शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा एकदा शोध मोहीम राबविली जाणार आहे. सतीश ऋषिकेश यांचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती आपत्कालीन विभागाचे प्रमुख रामेकर यांनी दिली आहे.

Intro:गुरुवारी गणपती विसर्जनादरम्यान वाठोडा शुक्लेश्वर येथे पूर्णा नदीत वाहून गेलेल्या चौघांपैकी दोघांचे मृतदेह हाती लागले आहे. आज दिवसभर सुरू असणारी शोधमोहीम सायंकाळी थांबली असून शनिवारी पुन्हा दोघांचा शोध घेतला जाणार आहे खासदार नवनीत राणा यांनी दुपारी घटनास्थळाला भेट देऊन शोध मोहिमेबाबत माहिती घेतली.

Body:गुरुवारी सायंकाळी गौरखेडा येथील घरगुती गणपतींचे विसर्जन वाठोडा शुक्लेश्वर येथून वाहणाऱ्या पूर्णा नदीत करण्यात आले. गणपती विसर्जना दरम्यान सतीश सोळंके वय 28 ऋषिकेश वानखेडे वय 22 संतोष वानखडे वय 45 आणि सागर शेंदुरकर वय 20 हे चार जण नदीत बुडाले होते. या घटनेमुळे वाठोडा शुक्लेश्वर सह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. रात्रभर नदीत बुडाले यांचा शोध घेण्यात आल्यावर आज सकाळी बचाव पथकाने पुन्हा एकदा शोध मोहीम राबविली असता दुपारी बारा वाजेच्या सुमारास संतोष वानखेडे यांचा मृतदेह हाती लागला होता.
दुपारी एक वाजेच्या सुमारास खासदार नवनीत राणा यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध मोहिमेचा आढावा घेतला तसेच घटनास्थळी जमलेल्या गौरखेडा वासियांची संवाद साधला. लगतच्या विश्रोळी धरणाचे दारू उघडण्यात आल्याने पूर्णा नदीला पूर आला होता. या पुरामुळे बचाव पथकाला उर्वरित तिघांचा शोध घेण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. नदीवरील असणाऱ्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात वाहून आलेले लाकडं कचरा अडकल्याने त्यांना काढण्यासाठी जेसीबी बोलविण्यात आला होता.
दरम्यान बचाव पथकाने मोठ्या अडचणीतही शोध मोहीम सुरूच ठेवली चार वाजेच्या सुमारास सागर शेंदुरकर याचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सतीश सोळंके आणि ऋषिकेश वानखेडे यांचा शोध घेण्यात आला. अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली .
शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा एकदा शोध मोहीम राबविली जाणार असून सतीश सोळंके आणि ऋषिकेश वानखेडे यांचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती आपत्कालीन विभागाचे प्रमुख रामेकर यांनी दिली आहे.

Conclusion:
Last Updated : Sep 13, 2019, 11:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.