ETV Bharat / state

अमरावतीत आझाद हिंद मंडळातर्फे शिबिराचे आयोजन, 170 रक्‍तदात्‍यांनी केले रक्तदान - अमरावती रक्तदान शिबीर न्यूज

कोरोना काळात रक्ताचीही कमतरता भासत आहे. त्यामुळे सरकार नेहमी रक्तदान करण्याचे आवाहन करत आहे. अमरावतीत आझाद हिंद मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 170 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Amravati
अमरावती
author img

By

Published : May 3, 2021, 4:56 PM IST

अमरावती- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. अशा परिस्थितीत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आणि रक्ताची गरज लक्षात घेता 'रक्तदान हेच श्रेष्ठ दान' हे बोधवाक्य अनेक संस्था, मंडळं कृतीतून अंगीकारत आहेत. याच उद्देशाने आझाद हिंद मंडळातर्फे नुकतेच रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्‍ये रक्‍तदात्‍यांनी रक्‍तदान केले.

अमरावतीत आझाद हिंद मंडळातर्फे शिबिराचे आयोजन, 170 रक्‍तदात्‍यांनी केले रक्तदान

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 लाखांचा धनादेशही

आझाद हिंद मंडळच्या वतीने मंडळाचे पदाधिकारी स्‍व.सोमेश्‍वर पुसतकर स्‍मृतीप्रित्‍यर्थ आयोजित रक्‍तदान शिबिराला युवकांचा उस्‍फुर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्‍हणजे सामाजिक वसा जपत मंडळाने या प्रसंगी 1 लाख रूपयांचा धनादेशही मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीला प्रदान केला. हा धनादेश मंडळाचे अध्‍यक्ष पद्मश्री प्रभाकर वैद्य यांच्‍या हस्‍ते मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांना सुपुर्द करण्‍यात आला. 1 मे पासून राज्‍यात 18 ते 44 वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्‍याचे सुरू झाले आहे. ही लस घेतल्‍यानंतर 6 महिने रक्‍तदान करता येत नाही. राज्‍यात एकीकडे रक्‍ताचा तुटवडा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेवून शहरात रक्‍तसाठा पुरेसा रहावा या उदात्‍त हेतूने हे रक्‍तदान शिबीर घेण्यात आले.

कोरोना काळातही लोक रक्त देण्यास रांगेत उभे होते. पण ब्लड बॅग संपल्या. कार्यक्रम सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होता. पण नाव नोंदणी टेबल साडेबारालाच ब्लड बॅग संपल्या कारणास्तव बंद करावा लागला. त्यामुळे अवघ्या 3 तासांमध्ये 170 ब्लड बॅग पूर्ण झाल्या. पुढल्यावर्षीसुद्धा असाच भव्य कार्यक्रम 1 मे रोजी घेणार येणार असल्याचे सांगण्यात आले.

या शिबाराला पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, राजाभाऊ मोरे, माजी महापौरविलास इंगोले, गटनेता दिनेश बुब, नगरसेवक विवेक कलोती, दिलीप कलोती, ज्ञानेश्‍वर हिवसे, प्रशांत देशपांडे, अनंत गुढे, संजय तिरथकर, भुषण पुसतकर, वैभव दलाल आदी उपस्थित होते.

हेही वाचा - 'शिरच्छेदाची धमकी कुणी दिली हे पुनावालांनी सांगावे' पाहा नाना पटोलेंची संपूर्ण पत्रकार परिषद

हेही वाचा - बेरोजगारीमुळे मोबाईल चोरी, पनवेल आर.पी.एफ.ने टोळीला केले गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.