ETV Bharat / state

भाजपचे चेतन गावंडे अमरावतीचे नवे महापौर, उपमहापौरपदी कुसूम साहुंची वर्णी - BJPs Chetan Gawande

शहराचे नवे महापौर म्हणून भाजपचे चेतन गावंडे निवडून आले आहेत. तर उपमहापौर म्हणून कुसूम साहू यांनी या निवडणुकीत बाजी मारली. निवडणुकीनंतर महापालिकेच्या आवारात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल वाजवून जल्लोष केला.

भाजपचे चेतन गावंडे अमरावतीचे नवे महापौर
author img

By

Published : Nov 22, 2019, 3:27 PM IST

Updated : Nov 22, 2019, 5:57 PM IST

अमरावती - शहराचे नवे महापौर म्हणून भाजपचे चेतन गावंडे निवडून आले आहेत. तर उपमहापौर म्हणून कुसूम साहू यांनी या निवडणुकीत बाजी मारली. निवडणुकीनंतर महापालिकेच्या आवारात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल वाजवून जल्लोष केला.

भाजपचे चेतन गावंडे अमरावतीचे नवे महापौर, उपमहापौरपदी कुसूम साहुंची वर्णी

आज सकाळी ११ वाजता अमरावती महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. महापौर पदासाठी भाजपचे चेतन गावंडे यांच्या विरोधात एमआयएमचे अफझल हुसेन मुनारक हुसेन आणि बसपाच्या माला देवकर या उमेदवार होत्या. हात उंचावून मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. चेतन गावंडे यांना ४९, अफझल हुसेन मुनारक हुसेन यांना २३ तर माला देवकर यांना ५ मते मिळाली.

उपमहापौर पदासाठी भाजपच्या कुसुम साहू, बसपाच्या इशरत बानो मन्नान खान आणि एमआयएमचे मोहमद साबीर यांच्यात लढत होती. या निवडणुकीत कुसुम साहू यांना ४९, इशरत बानो यांना ५ आणि मोहमद साबीर यांना २३ मते मिळाली. निवडणूक प्रक्रियेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी चेतन गावंडे यांची महापौर तर उपमहापौर म्हणून कुसुम साहू यांची निवड झाल्याची घोषणा केली.

काँग्रेसची एमआयएमला साथ -

महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने एमआयएमला साथ दिली. काँग्रेसचे विलास इंगोले आणि प्रदीप हिवसे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेऊन एमआयएमच्या उमेदवाराला मतदान केले.

युवा स्वाभिमान पक्षाचा भाजपला पाठींबा

आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या 3 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देत महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपच्या उमेदवारांना मतदान केले.

शिवसेनेची तटस्थ भूमिका -

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ७ सदस्य असणाऱ्या शिवसेनेने कोणालाही मतदान न करता तटस्थ भूमिका घेतली.

Intro:अमरावती शहराचे नवे महापौर म्हणून भाजपचे चेतन गावंडे निवडून आले आहेत तर उपमहापौर म्हणून निवडणुकीत बाजी मारली. निवडणुकीनंतर महापालिकेच्या आवारात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल वाजवून जल्लोष केला.

Body:आज सकाळी 11 वाजता अमरावती महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली.
महापौर पदासाठी भाजपचे चेतन गावंडे यांच्या विरोधात एमआयएमचे अफझल हुसेन मुनारक हुसेन आणि बसपाच्या माल देवकर या उमेदवार होत्या. हात उंच करून मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. चेतन गावंडे यांना 49, अफझल हुसेन मुनारक हुसेन यांना 23 तर मला देवकर यांना 5 मतं मिळाली.
उपमहापौर पदासाठी भाजपच्या कुसुम साहू, बसपाच्या इशरत बानो मन्नान खान आणि. एमआयएमचे मोहमद साबीर
कुसुम साहू यांना 49, इशरत बानो यांना 5 आणि मोहमद साबीर यांना 23 मतं मिळाली.
निवडणूक प्रक्रियेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी चेतन गावंडे यांची महापौर तर उपमहापौर म्हणून कुसुम साहू यांची निवड झाल्याची घोषणा केली.

काँग्रेसने दिली एमआयएमला साथ

महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने एमआयएमला साथ दिली. काँग्रेसचे विलास इंगोले आणि प्रदीप हिवसे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेऊन एमआयएमच्या उमेदवाराला मतदान केले.

युवस्वाभिमन पार्टीचा भाजपला पाठींबा

आमदार रवी राणा यांच्या युवस्वाभिमन पार्टीच्या 3 नागरसेवकांनी भाजपला पाठिंबा देत महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपच्या उमेदवारांना मतदान केले.

शिवसेना तटस्थ

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत 7 सदस्य असणाऱ्या शिवसेनेने कोणालाही मतदान न करता तटस्थ भूमिका घेतली.

Conclusion:
Last Updated : Nov 22, 2019, 5:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.