ETV Bharat / state

कुलरचा शॉक लागल्याने भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मृत्यू,  घटनेनंतर भाजप-काँग्रेसमध्ये राजकारण पेटले

कुलरचा शॉक लागल्यावर महिलेला गावातील प्राथमिक उपचार केंद्रात नेले. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने त्यांचा मृत्यू झाला.  या घटनेनंतर आमदार यशोमती ठाकूर आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयंत आमले यांनी एकमेकांच्या पक्षावर आरोप करताना दोषी डॉक्टरवर कारवाई  करण्याची समान मागणी केली.

author img

By

Published : Jul 6, 2019, 3:13 PM IST

संग्रहीत छायाचित्र

अमरावती- घर सारवत असताना कुलरचा शॉक लागलेल्या भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. तिवसा मतदारसंघात असणाऱ्या शिराळा येथे ही घटना घडली आहे. संगीता विजय आखरे (वय 28) असे मृत महिलेचे नाव आहे. कुलरचा शॉक लागल्यानंतर त्यांना गावातील प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आले होते. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

आज सकाळी संगीता विजय आखरे या घर सारवत असताना त्यांना कुलरचा शॉक लागला. शॉक लागल्याने बेशुद्ध झालेल्या संगीता आखरे यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यामुळे संगीता आखरे यांच्या नातेवाईकांनी त्यांची छाती दाबून त्यांना श्वास घेण्यास मदत केली. आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयंत आमले यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. यानंतर संगीता आखरे यांना अमरावतीकडे आणत असताना त्यांची प्राणज्योत मावळली. त्यानंतर अमरावतीत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला.

महिलेच्या मृत्यूनंतर यशोमती ठाकूर आणि जयंत आमले यांच्यात शाब्दिक वाद झाला.

या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पोचल्या. यावेळी ठाकूर यांनी डॉक्टरांकडे चौकशी केली असता डॉक्टरही योग्य माहिती सांगत नव्हते. त्यानंतर आखरे यांच्या नातेवाईकांनी मृतदेह शवविच्छेदनगृहात असल्याचे सांगितल्यावर आमदार यशोमती ठाकूर शवविच्छेदनगृहाकडे गेल्या. यावेळी संगीता आखरे यांच्या नातेवाईकांसह जयंत आमले हेसुद्धा तेथे होते.

यशोमती ठाकूर आणि जयंत आमले यांच्यात खडाजंगी

जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे आरोग्य केंद्र बंद राहतात, डॉक्टर जागेवर राहत नाहीत असा आरोप जयंत आमले यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यासमोर केला. आमले यांच्या आरोपावर प्रतिउत्तर देत आमदार यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणात राजकारण आणू नका. प्राथमिक आरोग्य केंद्रावर जिल्हा शल्यचिकित्सकांचे नियंत्रण असते. याबाबत त्यांना जाब विचारला लागेल आणि संबंधित डॉक्टरला निलंबित करण्याची मागणी कारवी लागेल. तुम्ही कुठलीही माहिती न घेता जिल्हा परिषदेला दोषी ठरवत असाल तर आरोग्यमंत्री भाजपचा आहे. हा त्यांचा दोष आहे, असे आमदार ठाकूर म्हणाल्या.

आमदार यशोमती ठाकूर आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयंत आमले यांनी एकमेकांच्या पक्षावर आरोप करताना दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याची समान मागणी केली.

Intro:अमरावती तालुक्यात येणाऱ्या आणि तिवसा मतदार संघात असणाऱ्या शिराळा येथे भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यास कुलरचा शोक लागल्यावर त्यांना त् गावातील प्राथमिक उपचार केंद्रात नेले. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक उपचार केंद्रांवर काँग्रेसची सत्ता असणाऱ्या जिल्हा परिषदेचे लक्ष नाही असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला असताना आमदार यशोमती ठाकूर यांनी हा राजकारणाचा विषय नाही. असे आरोप कराल तर आरोग्यमंत्री भाजपचा आहे असे लक्षात ठेवा असे उत्तर दिल्याने या प्रकरणात दुर्दैवाने राजकारण पेटले आहे.

Body:संगीता विजय आखरे(28) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या भाजपच्या पदाधिकारी होत्या. आज सकाळी त्या घर सारवत असताना त्यांना कुलरचा शॉक लागला. शॉक लागल्याने बेशुद्द झालेल्या संगीता आखरे यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तिथे डॉक्टरचा पत्ता नव्हता. संगीता आखरे यांच्या नातेवाईकांनी त्यांची छाती दाबून त्यांना श्वास घेण्यास मदत केली. आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयंत आमले यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. संगीत आखरे याना लगेच अमरावतीकडे आणत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
अमरावतीत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मृतदेह विच्छेदनासाठी ठेवण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच आमदार यशोमती ठाकूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पोचल्या. त्यांना शवविच्छेदन गृह येथे संगीता आखरे नावाच्या कोणत्याही महिलेचा मृतदेह इथे नाही अशी माहिती देण्यात आली. यंनातर त्यांनी डॉक्टरांकडे चौकशी केली असता डॉक्टरही योग्य माहिती सांगत नव्हते. आखरे यांच्या नातेवाईकांनी मृतदेह शवविच्छेदनगृहात असल्याचे सांगितल्यावर आमदार यशोमती ठाकूर पुन्हा शवविच्छेदनगृहकडे गेल्या. यावेळी संगीता आखरे यांच्या नातेवाईकांसह जयंत आमले हे सुद्धा तिथे होते. जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे आरोग्य केंद्र बंद राहतात, डॉक्टर जागेवर राहत नाहीत असा आरोप जयंत आमले यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यासमोर केला. आमले यांच्या आरोपावर प्रतिउत्तर देत आमदार यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणात राजकारण आणू नका. प्राथमिक आरोग्य केंद्रावर जिल्हा शल्यचिकित्सकांचे नियंत्रण असते. याबाबत त्यांना जाब विचारला लागेल. आणि संबंधीत डॉक्टरला निलंबित करण्याची मागणी कारवी लागेल. तुम्ही कुठलीही माहिती न घेता जिल्हा ओरिषदेला दोषी ठरवत असाल तर आरोग्यमंत्र भाजपचा आहे.हा त्यांचा दोष आहे असे म्हणावे असे आमदार ठाकूर म्हणाल्या.
दरम्यान आमदार यशोमती ठाकूर आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयंत आमले यांनी एकमेकांच्या पक्षावर आरोप करताना दोषी डॉक्टरवर करववी करण्याची समान मागणी केली.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.